मातृवंदना योजेनेचा 33 हजार 974 मातांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातृवंदना योजेनेचा 33 हजार 974 मातांना लाभ
मातृवंदना योजेनेचा 33 हजार 974 मातांना लाभ

मातृवंदना योजेनेचा 33 हजार 974 मातांना लाभ

sakal_logo
By

61929
..............................

‘मातृवंदना’चा ३३ हजार ९७४ मातांना लाभ
मातृशक्ती राष्ट्रशक्ती वंदना सप्ताह; चार वर्षात १३ कोटी ७४ लाख ८३ हजार रुपये वितरित
रत्नागिरी, ता. २ः प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत ७ सप्टेंबरपर्यंत मातृ शक्ती राष्ट्र शक्ती वंदना’ सप्ताह राबविण्यात येत आहे. या योजनेतून मागील चार वर्षात जिल्ह्यातील ३३,९७४ मातांना १३ कोटी ७४ लाख ८३ हजार रुपयांचा लाभ दिला आहे. सध्या पात्र असलेल्या लाभार्थीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत.
मातृवंदना योजनेंतर्गत १ जानेवारी २०१७ रोजी किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या माताची प्रसूती किंवा गर्भधारणा झाली असेल त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे. या महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल. यामध्ये लाभार्थ्याच्या आधार संलग्नित बँक किंवा पोस्ट खात्यात पाच हजार रुपये वर्ग केले जातात. लाभ देण्याचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा एक हजार रुपये असून गर्भधारणा नोंदणीनंतर दिला जातो. दुसरा टप्पा दोन हजार रुपये प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास आणि गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यास मिळतो. तिसरा टप्पा दोन हजार रुपये प्रसूतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी व बालकास लसिकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यात ३३,९७४ मातांना १३ कोटी ७४ लाख ८३ हजार रुपये लाभार्थीच्या खात्यावर वर्ग होतात. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्ण्यालय, जिल्हा रुग्णालय सर्व शासकीय संस्थेत माहितीपत्रकाचे वाटप तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थी लाभ देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थीने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीमती इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीमती संघमित्रा फुले यांनी आवाहन केले आहे.

चौकट
चार वर्षातील लाभाची तालुकानिहाय आकडेवारी ः
तालुका लाभार्थी दिलेली रक्कम (रुपये)
*मंडणगड *१४२५ *५७ लाख ४६ हजार
* दापोली *३०७० *१ कोटी २५ लाख ४७ हजार
* खेड *३३२४ *१ कोटी ३३ लाख ३० हजार
* गुहागर *२३३० *९० लाख ९८ हजार
* चिपळूण *४९९६ *२ कोटी १ लाख ६९ हजार
* संगमेश्वर *३७६२ *१ कोटी ५६ लाख ७९ हजार
* रत्नागिरी *६०६५ *२ कोटी ४६ लाख १२ हजार
* लांजा *२१५७ *८८ लाख ६८ हजार
* राजापूर *२७०८ *११ लाख ९५ हजार
* खेड शहर *३७६ *१४ लाख ८९ हजार
* चिपळूण शहर *१३८७ *५४ लाख १६ हजार
* राजापूर शहर *१८८ *७ लाख ५७ हजार
* रत्नागिरी शहर *१८८० *७६ लाख ९४ हजार
* दापोली शहर *३०६ *९ लाख ८३ हजार

चौकट
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
* माता लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड
* बँक किंवा पोस्ट खाते
* माता नोंदणी नोंदणी कार्ड
* बाळाचा जन्म दाखला
* लसीकरण कार्ड

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92756 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..