माने कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माने कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
माने कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

माने कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

मुख्याध्यापिका माया गोखले सेवानिवृत्त
साडवली ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका माया गोखले सेवानिवृत्त झाल्या. २६ वर्षे त्यांनी अध्ययनाचे कार्य केले. या काळात शाळेसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवून बक्षिसे मिळवून दिली. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. विशेष म्हणजे ज्या शाळेत शिकल्या त्याच शाळेत शिक्षिका व मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली. निवृत्तीनिमित्त स्कूलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
---------
माने कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
साडवलीः आंबव येथील राजेंद्र माने इंजिनिअरिंग कॉलेजन युवा महोत्सवात चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना युनिटतर्फे या विद्यार्थ्यांचा सत्कार मनसे मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आला. या वेळी मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, शहराध्यक्ष सागर संसारे, देवरूख उपशहराध्यक्ष शेखर नलावडे आदी उपस्थित होते. सुयोग रहाटे, प्रसाद साळवी, ओंकार ब्रीद, स्वरूप दोरखेडे, प्रीती पाष्टे, तनुजा शिवतरकर, शर्वरी अवसरे, सागर जाधव, सायली महाडिक आदींचा याप्रसंगी गौरव करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92767 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..