रत्नागिरी- नेत्र संकलन केंद्रातर्फे तिसरे नेत्रसंकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- नेत्र संकलन केंद्रातर्फे तिसरे नेत्रसंकलन
रत्नागिरी- नेत्र संकलन केंद्रातर्फे तिसरे नेत्रसंकलन

रत्नागिरी- नेत्र संकलन केंद्रातर्फे तिसरे नेत्रसंकलन

sakal_logo
By

नेत्र संकलन केंद्रातर्फे तिसरे नेत्रसंकलन
लायन्स नेत्ररुग्णालय ; चार तासात गुहागरात पोचून कार्यवाही
रत्नागिरी, ता. २ : एमआयडीसी मिरजोळे येथील लायन्स नेत्ररुग्णालयाच्या नेत्र संकलन केंद्रातर्फे तिसरे नेत्रसंकलन नुकतेच करण्यात आले. गुहागर येथील ६५ वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. त्यानंतर नातेवाइकांना नेत्रदानाचे महत्व सांगितल्यानंतर त्यांनी लगेचच लायन्स नेत्रसंकलन केंद्राशी संपर्क साधला आणि गुहागरमध्ये चार तासांत पोहोचून नेत्रसंकलन करण्यात आले. यामुळे दोन जणांना दृष्टी प्राप्त होणार आहे. नेत्रसंकलन पंधरवड्यात ही घटना घडल्यामुळे नेत्रदानाची चळवळ अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास कार्यकर्ते समीर करमरकर यांनी व्यक्त केला.
गुहागर येथील विलास पुरुषोत्तम पटवर्धन (वय ६५) यांचा नैसर्गिक मृत्यू ३० ऑगस्टला सकाळी ८.१४ वाजता झाला. त्यांच्या नेत्रदानासंदर्भात गुहागर येथील नेत्रचिकित्सा तंत्रज्ञ दिनेश जोशी यांनी श्री. पटवर्धन यांच्या कुटुंबीयांना घरी जाऊन दिली. कुटुंबातील व्यक्ती नेत्रदानाला तयार झाल्यावर लगेचच त्यांनी रत्नागिरीतील लायन्स नेत्रसंकलन केंद्रामध्ये फोन केला. त्यांनी मृत व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अँटीबायोटिक औषधे टाकण्यास लगेच सुरवात केली. नेत्रसंकलन केंद्रातील किशोर सुर्यवंशी यांनी गुहागरला नेत्रसंकलनासाठी जाण्याची परवानगी घेतली. ते योगेश पाटील यांना सोबत घेऊन दुपारी १२.१५ वाजता गुहागर येथे पोहोचले आणि लगेचच १२.४५ वाजता यशस्वीपणे दोन्ही पारपटले (कॉर्निया) काढली. एवढ्या लांबच्या नेत्रसंकलनासाठी जाण्यासाठी परवानगी देण्याबद्दलचा निर्णय अत्यंत तातडीने घेतल्याबद्दल डॉ. भोळे आणि डॉ. बेडेकर आणि हे कार्य प्रत्यक्ष पूर्णत्वाला नेण्याबद्दल किशोर सुर्यवंशी आणि सहकारी योगेश पाटील आणि गुहागरचे दिनेश जोशी आणि पटवर्धन यांचे कुटुंबीयांचे कौतुक करण्यात आले.

कोट
नेत्रदानाचे विशेष महत्व म्हणजे २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या जागतिक नेत्रदान जागरुकता पंधरवड्यामध्ये नेत्रदान झाले. त्यामुळे किमान दोन जणांना दृष्टी प्राप्त होईल, याचा विशेष आनंद आहे.
- समीर करमरकर, नेत्रदान जागरुकता चळवळ कार्यकर्ता

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92768 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..