rat0215.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat0215.txt
rat0215.txt

rat0215.txt

sakal_logo
By

मुरुवाडा- झोपडपट्टीत तेरा जुगारीविरुद्ध कारवाई
रत्नागिरी, ता. २ ः शहरातील मुरुगवाडा-झोपडपट्टी येथे अवैधरित्या चालणाऱ्या तीन पत्ती जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. जुगार खेळणाऱ्या तेरा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. महेंद्र मधुसूदन मांजरेकर (वय ४५रा. मुरुगवाडा-रत्नागिरी), अनंत बळीराम मयेकर (५७, मुरुगवाडा), रोहित संतोष चव्हाण (२५, मुरुगवाडा) संतोष भास्कर नागवेकर (४२, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी), सुरेंद्र सुरेश सुर्वे (३९, पेठकिल्ला, रत्नागिरी), राकेश पद्माकर पारकर (य ३४, रा. मुरुगवाडा), शेखर चंद्रकांत भोंगले (४७, मुरुगवाडा), सतेज प्रमोद मयेकर (४०, मुरुगवाडा), सचिन जनार्दन सुर्वे (४७, मुरुगवाडा), जितेंद्र संभाजी पाटील (३२, मांडवी-रत्नागिरी), शिवाप्पा हनुमंत कोळी (४१, मुरुगवाडा, रत्नागिरी), सुभाष संतोष मयेकर (२६, मुरुगवाडा), सचिन गजाजन मयेकर (३५, मुरुगवाडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ३१) ऑगस्टला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मुरुगवाडा येथे अवैधरित्या तीन पत्ती जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. अचानक पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुगार अड्यावर गोंधळ उडाला. पोलिसांनी चारही बाजूनी फौजफाटा लावल्याने सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस नाईक अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92779 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..