रत्नागिरी- मध्यवर्ती बँकेने नेहमीच जोपासले शेतकर्‍यांचे हित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- मध्यवर्ती बँकेने नेहमीच जोपासले शेतकर्‍यांचे हित
रत्नागिरी- मध्यवर्ती बँकेने नेहमीच जोपासले शेतकर्‍यांचे हित

रत्नागिरी- मध्यवर्ती बँकेने नेहमीच जोपासले शेतकर्‍यांचे हित

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat2p13.jpg- KOP22L47291संगमेश्वर ः धनादेश वितरण करताना आमदार शेखर निकम आणि अन्य पदाधिकारी व कर्मचारी.


मध्यवर्ती बँकेने जोपासले शेतकऱ्यांचे हित
---
शेखर निकम ; आपत्तीग्रस्ताला एक लाखाचा धनादेश
रत्नागिरी, ता. 2 ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकर्‍यांचे हित जोपासले आहे. आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांनाही बँकेकडून नेहमीच मदतीचा हात बँकेकडून दिला जातो असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी देवरुख येथे केले.
संगमेश्वर तालुक्यातील पाचंबे येथे गोठ्यावर वीज पडून नुकसान झालेल्या संजय जाधव यांना बँकेकडून एक लाखाचा धनादेश आमदार निकम यांच्या हस्ते देवरुख येथील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आमदार निकम म्हणाले, ‘पाचांबेतील दुग्ध व्यवसायिक जाधव यांच्या गोठ्याची पाहणी केली होती. डोळ्यातून अश्रू यावेत अशीच ही घटना होती. 13 जनावर मृत झाल्यानं या दुग्ध व्यावसायिकांवर मोठं संकट उभा राहिलं. अशावेळी त्यांना थोडाफार आधार द्यावा या भावनेतून बँकेकडून धनादेश देण्यात आला आहे.’
संचालक राजेंद्र सुर्वे म्हणाले, ‘जाधव यांना तत्काळ विना अटी-शर्टी कर्ज देण्याची भूमिका बँकेने ठेवली होती. ही मदत मंजूर करण्यामध्ये अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचा मोलाचा वाटा आहे.’
संचालिका नेहा माने, गटविकास अधिकारी भरत चौगले, राष्ट्रवादी देवरुखचे शहराध्यक्ष हनीफ हरचिरकर, बाळू ढवळे, संतोष लाड, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सहाय्यक निबंधक संतोष कुमार पाटील, विनोद मस्के, बँकेचे तालुका निरीक्षक तुषार साळुंखे, व्यवस्थापक संतोष जाधव, शाखा व्यवस्थापक रविकांत शिंदे, पंकज पूसाळकर, पाचंबे सरपंच संदेश घाडगे, नारायण भुरवणे उपस्थित होते.

.....कळंबटे...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92780 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..