चिपळूण ः चिपळूण तालुक्यातील 162 गावाना मिळणार पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळूण तालुक्यातील 162 गावाना मिळणार पाणी
चिपळूण ः चिपळूण तालुक्यातील 162 गावाना मिळणार पाणी

चिपळूण ः चिपळूण तालुक्यातील 162 गावाना मिळणार पाणी

sakal_logo
By

चिपळूण तालुक्यातील
१६२ गावांना मिळणार पाणी
---
जलजीवन मिशन योजना; प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर
चिपळूण, ता. २ : शासनाने ‘हर घर नल से जल’ या उपक्रमांतर्गत २०२४ पर्यंत नळाद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी नियोजित करण्यात आलेले जलजीवन मिशन यशस्वी करताना सर्वप्रथम तहानलेल्या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील १६२ गावांमध्ये ही योजना राबवली जात आहे.
कोकणात या मिशनला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांतील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन योजनेत प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वातील ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजनाही आता ५५ लिटर प्रतिमाणसी प्रतिदिवस योजनेत परिवर्तित होणार आहेत.
सर्व शाळा, अंगणवाड्या यांनाही पुढील १०० दिवसांत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्याचे उद्दिष्ट या मिशनमध्ये निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला त्यांच्या घराजवळ नळजोडणी उपलब्ध करून देण्यात येईल. पाणीपुरवठा शाश्वत व्हावा, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनांची पूर्तता या योजनेत समाविष्ट आहे. तसेच, सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना करणे व देखभाल, दुरुस्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकसहभागातून करण्यात येणार आहे. १० ते ४० लाख अंदाजपत्रकाच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे; तर मोठ्या अंदाजपत्रकाच्या योजना अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील अशा ५३ गावांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे. या गावांतील पाणी योजना राबविण्यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित योजनेचे काम करू इच्छिणाऱ्या ठेकेदारांची बैठक घेतली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत आखणी सुरू आहे. त्यामुळे एखाद्या ठेकेदाराने योजनेचे काम हाती घेतल्यास विनाविलंब आणि कोणत्याही अडचणी न सांगता योजना पूर्ण करावी लागेल, अशा सूचना त्यांनी ठेकेदारांना दिल्या आहेत.
.................
कोट
शासनाच्या जल जीवन मिशन योजनेचे प्रभावी काम चिपळूण तालुक्यात सुरू आहे. १६२ गावांमध्ये लहान-मोठ्या योजना राबविल्या जाणार आहेत. यातील काही योजनांचे काम सुरू झाले; तर काहींचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.
- अविनाश जाधव, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92782 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..