आधारकार्डशी १,५५३२ मतदार लिंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधारकार्डशी १,५५३२ मतदार लिंक
आधारकार्डशी १,५५३२ मतदार लिंक

आधारकार्डशी १,५५३२ मतदार लिंक

sakal_logo
By

47334

आधारकार्डशी १,५५३२ मतदार लिंक

निवडणूक विभाग; कुडाळ तालुका अव्वल, कणकवली मागे

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः मतदारांची ओळख पटवणे आणि मतदार यादीमधील नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मतदान कार्डला आधारकार्ड जोडण्याचे काम राज्यात १ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. जिल्ह्यात ६ लाख ७० हजार ७७२ एवढे मतदार आहेत. पैकी आतापर्यंत १ लाख ५ हजार ५३२ मतदारांनी आपल्या मतदानकार्ड सोबत आधारकार्ड लिंक केले आहे.
जिल्ह्यात १ ऑगस्टपासून आधारकार्ड-मतदानकार्ड सोबत जोडणी करण्याचे काम निवडणूक विभागामार्फत सुरू आहे. यात जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच आतापर्यंत ४२ हजार ४५७ मतदारांनी आधारकार्ड मतदानकार्ड सोबत जोडले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहे तर सर्वांत कमी आधार जोडणी कणकवली विधानसभा मतदारसंघात झाली आहे.
-----------
विधानसभा मतदार*लिंक मतदार
कणकवली*२३०५३४*२५८३०
कुडाळ*२१५९०४*४२४५८
सावंतवाडी*२२४३३४*३७२४५
-----------
कोट
मतदारांची ओळख पटवणे आणि मतदार यादीमधील नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मतदान कार्ड ला आधार कार्ड शी जोडण्याचे काम जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आधारकार्ड मतदानकार्ड सोबत जोडून घ्यावे.
- निवडणूक विभाग, सिंधुदुर्ग

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92796 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..