चिपळूण -चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद पण चेहऱ्यावर मास्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण -चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद पण चेहऱ्यावर मास्क
चिपळूण -चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद पण चेहऱ्यावर मास्क

चिपळूण -चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद पण चेहऱ्यावर मास्क

sakal_logo
By

चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद, पण चेहऱ्यावर मास्क
--
एटीएममधील चोरी ; सर्व रस्त्यांवरील फुटेजची तपासणी
चिपळूण, ता. २ : शहरातील गजबजलेल्या भोगाळे परिसरातील युनियन बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १४ लाख ५० हजाराची रोख रक्कम गुरुवारी (ता. १) पहाटे लंपास केली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैंद असले तरी त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. चोरट्यांची सिल्व्हर रंगाची मोटार असून ते चार ते पाचजण असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मोटार कोणत्या रस्त्याने गेली यासाठी सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई चिपळूणला दाखल झाल्या आहेत. युनियन बँकेकडून एटीएम मॅनेजर संतोष काशिराम झगडे यांनी याची फिर्याद चिपळूण पोलिस ठाण्यात दिली.
भोगाळे येथे युनियन बँकेच्या शाखेच्या परिसरातच बँकेचे एटीएम सेंटर आहे. बुधवारी गणेशोत्सवानिमित्त बँकेला सुट्टी होती. ही संधी साधून चोरट्यांनी पहाटे ४.२४ वाजता एटीएम फोडले. चोरट्यांनी १४ लाख ५० हजाराची रोकड पळवली. ही धाडसी चोरी असून पोलिस संपूर्ण राज्यभर चक्रे फिरवित आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून रस्त्याच्याकडेला असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिस तपासत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी, रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. वाघमारे, जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शाह व त्यांचे सहकारी, चिपळूणचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी या तपास कामात गुंतले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92800 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..