खवले मांजर संवर्धनाची वाढतेय जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खवले मांजर संवर्धनाची वाढतेय जागृती
खवले मांजर संवर्धनाची वाढतेय जागृती

खवले मांजर संवर्धनाची वाढतेय जागृती

sakal_logo
By

लोगो ः काही सुखद
--
47332
पिकुळे ः येथे ताब्यात घेतलेल्या खवले मांजरासोबत वनकर्मचारी, कृष्णा महालकर, सरपंच दीक्षा महालकर, फटी गवस आदी.

खवले मांजर संवर्धनाची वाढतेय जागृती

दोडामार्ग तालुका; उगाडे पाठोपाठ पिकुळेतही जीवदान

सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. २ ः निसर्गसंपन्न दोडामार्ग तालुका दुर्मिळ खवल्या मांजराचे संवर्धन करणारी निसर्गपूजक भूमी बनत आहे तर वनविभागाची ''खवलेमांजर वाचवा'' मोहीम प्रभावी ठरते आहे. स्थानिकही निसर्ग आणि वनविभागाला सहकार्य करत आहेत. उगाडे येथे खवले मांजराला तेथील शेतकरी सखाराम राणे यांनी जीवदान दिल्याची घटना ताजी असतानाच पिकुळे येथेही खवले मांजराला जीवदान दिल्याची घटना घडली. तेथील शेतकरी कृष्णा महालकर यांनी खवले मांजर वाचवून वनविभागाच्या खवले मांजर वाचवा उपक्रमास हातभार लावलाच; पण वन्यप्राणी, निसर्ग आणि पर्यावरण याबाबतची बांधिलकीही त्यांनी जपली.
पिकुळे (लाडाचेटेंब) येथील शेतकरी कृष्णा महालकर यांना रात्री २ वाजताच्या दरम्यान दुर्मिळ असे खवले मांजर आपल्या परसजागेत अडकले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कुत्रे व इतर नैसर्गिक शिकारी यांच्यापासून त्याचे संरक्षण करून त्याला अभय दिले व त्याबाबतची माहिती आज सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्ग येथे कळविली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्गचे बचावपथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व ते खवलेमांजर वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी ताब्यात घेण्यात आले. त्या खवलेमांजरावर वन्यपशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी पूर्णतः निरोगी असल्याचे सांगितल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मणेरी वनपाल संग्राम जितकर, वनरक्षक दत्तात्रय मुकाडे, वनमजुर विश्राम कुबल, संतोष शेटकर व इतर कर्मचाऱ्यांनी खवले मांजर वाचवण्यात व त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात महत्वाची भूमिका बजावली.
----------
चौकट
महालकर यांना बक्षीस
जगात सर्वातजास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मिळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभाग दोडामार्ग येथील वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी ‘खवलेमांजर वाचवा’ मोहीम राबविली आहे. या अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग क्षीरसागर यांनी दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दुर्मिळ खवलेमांजराच्या संवर्धन व संरक्षणाकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या मोहिमेत सहभागी होत खवले मांजराची माहिती वनविभागाला वेळेत कळवून त्या खवलेमांजराचे प्राण वाचवल्याबद्दल वनविभागाच्यावतीने श्री. महालकर यांचे आभार मानून त्यांना एक हजार रुपये रोख बक्षीस दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92803 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..