रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाची हूलकावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाची हूलकावणी
रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाची हूलकावणी

रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाची हूलकावणी

sakal_logo
By

फोटो ओळी
- KOP२२L४७३७९ रत्नागिरी ः पोमेंडी खुर्द येथील तरारलेली भातशेती.
-------------
जिल्ह्यात पावसाची हुलकावणी
दिवसातून एखादी सर ; भातशेतीला हवे पाणी
रत्नागिरी, ता. २ ः दुपारपर्यंत कडकडीत उन आणि त्यानंतर विजांच्या कडकाडाटासह हलका पडलेला पाऊस यामुळे वातवरणात उकाडा वाढला होता; मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार अपेक्षित पाऊस झालाच नाही. सायंकाळी समुद्र किनारी भागात वारे वाहत होते. पण पावसाने रत्नागिरीकरांना हुलकवणीच दिली. आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पाचशे मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ३ मिमी पावसाची नोंद झाली. खेड- २५, रत्नागिरी- १, लांजा- १ मिमी पाऊस झाला. उर्वरित सहा तालुके कोरडेच गेले. मागील तीन दिवसात संगमेश्‍वर, गुहागर, चिपळूण, लांजामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती. सावधगिरीचा उपाय म्हणून काही काळ वीज पुरवठाही खंडित करण्यात आला. पावसाचा जोर जास्त काळ टिकला नाही. हवामान विभागाने ३ सप्टेंबरपर्यंत हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी अचानक ढगाळ वातावरण होते. विजांचे तांडवही आकाशात सुरू झाले. पावसाला सुरवात झाली, मात्र हा जोर जास्त काळ टिकला नाही. वार्‍याबरोबर पावसाचे ढग पुढे सरकत निघून गेले. मागील आठ दिवसांमध्ये दुपारी कडकडीत उन पडत आहे. हवेतही उष्मा वाढलेला आहे. अधुनमधून हलकी सर पडल्यामुळे तेवढाच काय तो दिलासा मिळत आहे.
पाऊस गायब झाल्यामुळे भातशेतीला पाण्याची आवश्यकता भासत आहे. पावसाने अशीच पाठ फिरवली तर कातळावरील शेतीला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या भातामध्ये दाणे भरण्याची क्रिया सुरु झाली आहे. या कालावधीत पुरेसे पाणी खाचरामध्ये लागते. खत आणि पाणी समप्रमाणात राहीले तर त्याचा फायदा उत्पादन वाढीवर होतो. ऑगस्टच्या सुरवातीला पडलेल्या पावसामुळे भातशेती करपण्यापासून वाचली होती. आता पुन्हा तेच संकट आ वासून उभे राहीले आहे. पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणची शेती तरारली असून काही ठिकाणी लोंब्याही दिसू लागल्या आहेत.


चौकट
तुलनेत यंदा कमी पाऊस
जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत २ हजार ९९८ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत ३ हजार ४५४ मिमीची नोंद झाली होती. तुलनेत यंदा पाचशे मिमीहून कमी पाऊस झाला आहे. यावर्षी सलग पाऊस पडत राहणार्‍या दिवसांचा कालावधी कमी आहे. चार ते पाच दिवस सतत पाऊस, त्यानंतर मोठा काळ विश्रांती अशी स्थिती तीन महिन्यात सर्वाधिकवेळा दिसत होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92808 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..