रत्नागिरी-एलआयसी एजंटांची काळ्या फिती लावून निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-एलआयसी एजंटांची काळ्या फिती लावून निदर्शने
रत्नागिरी-एलआयसी एजंटांची काळ्या फिती लावून निदर्शने

रत्नागिरी-एलआयसी एजंटांची काळ्या फिती लावून निदर्शने

sakal_logo
By

फोटो KOP22L47377

एलआयसी एजंटांची काळ्या फिती लावून निदर्शने
रत्नागिरी, ता. २ ः भारतीय जीवन विमा (एलआयसी) इंडिया तियाफी संघटनेच्या संलग्न रत्नागिरी शाखेतर्फे सर्व एजंटांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी काळ्या फिती लावून निदर्शने केली. एलआयसी पॉलिसीवरील जीएसटी बंद करणे, विमेदारांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज दर कमी करणे, पाच वर्षापेक्षा जास्त काळ बंद झालेल्या पॉलिसी सुरू करणे, एजंटासाठी पेन्शन आणि प्राव्हिडंट फंड सुरू करणे, पॉलिसीधारकांनी दावा न केलेल्या रक्कमा सामाजिक सुरक्षा योजनेत जमा केले जाऊ नयेत, एकदा विमेदाराकडून केवायसी घेतल्यानंतर त्याच विमेदाराकडून वेळोवेळी केवायसी मागणी करण्यात येऊ नये, विमा प्रतिनिधीच्या कमिशनमध्ये कमिशन दर कमी न करता तो वाढविण्यात यावा. भारत सरकारने विमा प्रतिनिधींना व्यावसायिक म्हणून मान्यता द्यावी अशा मागण्यांचा समावेश आहे. त्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी रत्नागिरी शाखेचे विमा प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरुण पाटील, उत्तमचंद जैन, संजय नागवेकर, गनेश्वर राऊत, सहसेक्रेटरी अजित बोंबले, सहखजिनदार श्रीकांत फगरे, उदय पाटील, नीलेश देसाई, बाबा आंग्रे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92809 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..