कणकवलीत कार्यकर्ता शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत कार्यकर्ता शिबिर
कणकवलीत कार्यकर्ता शिबिर

कणकवलीत कार्यकर्ता शिबिर

sakal_logo
By

कणकवलीत कार्यकर्ता शिबिर
कणकवली ः सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्रतर्फे येथील म्हाळसाबाई भांडारकर स्मारक ट्रस्ट येथे कार्यकर्ता शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात विविध विषयांवर चचासत्रे व मार्गदर्शन होणार आहे. रविवारी (ता.४) सकाळी नऊला ‘जात-वर्ग-स्त्रीदास्य मुक्तीसाठी सांस्कृतिक व राजकीय पर्याय’ याविषयी चर्चासत्र होणार आहे. सूत्रसंचालन वाय. जी. कदम करणार आहेत. त्यानंतर प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचे ‘सेक्युलॅरिझमसमोरील आजची आव्हाने’ हे समारोपाचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. शरद मणचेकर सूत्रसंचालन करतील. याप्रसंगी युवा नेते डॉ. जालिंदर घिगे, सामाजिक कार्यकर्ते अतुल वाघ, प्रा. सिद्धार्थ तांबे, दर्पण प्रबोधिनीचे संदेश कदम, सत्यशोधक सेक्युलर फ्रंटचे राज्य निमंत्रक संग्राम सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. अ‍ॅड. सुदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92823 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..