रावराणे महाविद्यालयाला ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावराणे महाविद्यालयाला ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार
रावराणे महाविद्यालयाला ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार

रावराणे महाविद्यालयाला ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार

sakal_logo
By

47367
वैभववाडी ः येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय.

रावराणे महाविद्यालयाला ‘बेस्ट कॉलेज’ पुरस्कार

सोमवारी वितरण; शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडासह विविध उपक्रमांत दैदिप्यमान काम

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडासह विविध उपक्रम राबवुन दैदिप्यमान कामगिरी करीत असलेल्या येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज पुरस्कार जाहीर झाला आहे. याचे वितरण शिक्षक दिनी ५ ला मुंबईत होणार आहे. आतापर्यत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या या महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून संस्था पदाधिकारी आणि प्राचार्य, प्राध्यापक वर्गाचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथील शिक्षण संस्थेने आनंदीबाई रावराणे महाविद्यालय १९९२ मध्ये सुरू केले. कला शाखेपासून सुरूवात झालेल्या या महाविद्यालयात आता कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाविद्यालयीन शिक्षण देत असताना विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम या महाविद्यालयात राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उत्कृष्ट काम येथे सुरू आहे.कला,क्रीडा क्षेत्रात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी चमकदार कामगिरी केली आहे. याशिवाय विविध स्पर्धामध्ये देखील महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यामुळे नॅक परिक्षणात देखील महाविद्यालयात अ ग्रेडचा दर्जा मिळाला आहे. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यानी सर्व क्षेत्रात यश मिळवावे म्हणून राबविले जाणारे उपक्रम आणि महाविद्यालयाची एकुणच सुरू असलेली घौडदौड याचा विचार मुंबई विद्यापीठामार्फत ग्रामीण भागातील महाविद्यालयासाठी दिला जाणारा बेस्ट कॉलेज पुरस्कार आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर केल्याचे पत्र मुंबई विद्यापीठाचे उप निबधंक दिपक वसावे यांनी प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांना दिले आहे. या पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे.
---
कोट
महाविद्यालयात मिळालेला बेस्ट कॉलेज हा पुरस्कार नवीन ऊर्जा देणारा आहे. संस्था पदाधिकारी आणि सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्गाच्या टीमवर्कचे हे फलित आहे. नव काहीतरी करण्याची उमेद या पुरस्कारातून मिळेल.
- डॉ. सी. एस. काकडे, प्राचार्य, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92850 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..