‘सालईवाड्याचा राजा’ सावंतवाडीत विराजमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सालईवाड्याचा राजा’
सावंतवाडीत विराजमान
‘सालईवाड्याचा राजा’ सावंतवाडीत विराजमान

‘सालईवाड्याचा राजा’ सावंतवाडीत विराजमान

sakal_logo
By

47456
सावंतवाडी ः येथील आदिनारायण मंगल कार्यालयासमोर प्रतिष्ठापना केलेला ‘सालईवाड्याचा राजा’.

‘सालईवाड्याचा राजा’
सावंतवाडीत विराजमान
नव्याने प्रतिष्ठापना; सर्वधर्मसमभावाचा संदेश

सावंतवाडी, ता. ३ ः शहरात भट्टीवाडा युवक सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या माध्यमातून यंदापासून नव्याने सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. येथील आदिनारायण मंगल कार्यालयासमोर टेम्पो स्टॅंण्डनजीक ‘सालईवाड्याचा राजाची’ प्रतिष्ठापना केली असून यंदापासून १७ दिवसांचा गणेशोत्सव येथे साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश या मंडळाने समाजाला दिला आहे.
मंगळवारी रात्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी शहरात या गणरायाचे आगमन झाले. ढोलताशाच्या गजरात वाजतगाजत, फटाक्यांची आतषबाजी करत पहिल्या वर्षीच्या गणरायाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यामुळे हा आगमन सोहळा लक्षवेधी ठरला. विशेष म्हणजे या मिरवणुकीत हिंदू बांधवांसह मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तर सालईवाडा येथील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. सावंतवाडी शहर हे ''सर्वधर्मसमभावा''चे प्रतीक असून येथे संस्थानकालापासून एकात्मतेची जोपासना केली जात आहे. आज या मंडळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा एकोपा दिसून आला आहे. मंडळाच्या माध्यमातून १७ दिवस विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून सावंतवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात या मंडळाच्या रुपाने एका नव्या मंडळाची भर पडली आहे. सतराव्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92949 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..