माजी विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा
माजी विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा

माजी विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा

sakal_logo
By

47455
कलंबिस्त ः स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आलेले हायस्कूलचे विद्यार्थी.

माजी विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा

कलंबिस्तचा स्नेहमेळा; १९९३-९४ च्या बॅचचे वर्गमित्र आले एकत्र

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः कलंबिस्त (ता.सावंतवाडी) इंग्लिश स्कूलच्या १९९३-९४ च्या बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात झाला. निवृत्त मुख्याध्यापक सुर्वे सर व (कै.) एस्. व्ही. पाटील यांच्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या बॅचचा वॉट्सअॅप ग्रुप स्थापन करीत आर्थिक सहयोगातून हायस्कूलच्या नूतन शैक्षणिक संकुलातील एका वर्गखोलीच्या फ्लोरिंगचे काम पूर्ण करून सर्व माजी विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला. तसेच पुणे येथील एका संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या स्वच्छतागृहासाठी ७५ हजार आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या कामाबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्नेहमेळाव्यासाठी या बॅचमधील सतीश सावंत, कल्पना पास्ते, महेश मडगावकर, विजय मडगावकर, संजीव पालकर, विष्णू राऊळ, महेश राऊळ, दीपक राऊळ, आप्पा घाडी, सुधाकर कुडतरकर, प्रवीण कुडतरकर, अनिल देसाई, सोनू आईर, सोमकांत सावंत, संजीव सावंत, सूरज पवार आदी उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून प्रशालेतील अनेक आठवणींना उजाळा दिला. या नूतन शैक्षणिक संकुलातील तळमजल्यावरील सर्व वर्गखोल्यांच्या फ्लोरिंगचे काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच शाळेच्या विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला प्रशालेचे वरिष्ठ लिपीक विष्णू पास्ते, रवीकमल सावंत, रोहित पास्ते उपस्थित होते. मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी या स्नेहमेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92950 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..