‘ई केवायसी’साठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ई केवायसी’साठी मुदतवाढ
‘ई केवायसी’साठी मुदतवाढ

‘ई केवायसी’साठी मुदतवाढ

sakal_logo
By

‘ई केवायसी’साठी मुदतवाढ
सावंतवाडी ः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा बारावा हप्ता जमा होण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत होती. आता ही मुदत ७ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तालुक्यातील सुमारे अठरा हजार लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याबाबतच्या सूचना संबंधित ग्रामसेवकांच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांनी बारावा हप्ता मिळण्यासाठी ही ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी महा-ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील सीएससी सेंटर या ठिकाणी ७ पर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले आहे.
..............
देवगडात शेतकऱ्यांना आवाहन
देवगड : पीएम किसान योजनेंतर्गत तालुक्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी ती बुधवारपर्यंत (ता. ७) पूर्ण करण्याचे आवाहन येथील नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी केले आहे. देवगड तालुक्यात अद्याप ७ हजार ८९९ लाभार्थी शिल्लक आहेत. प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांना योजनेचा बारावा हप्ता मिळणार नाही, असेही नायब तहसीलदार ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92953 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..