चालकाचे नियंत्रण सुटून कोंडयेत एसटीला अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालकाचे नियंत्रण सुटून
कोंडयेत एसटीला अपघात
चालकाचे नियंत्रण सुटून कोंडयेत एसटीला अपघात

चालकाचे नियंत्रण सुटून कोंडयेत एसटीला अपघात

sakal_logo
By

47475
कोंडये ः येथील अपघातग्रस्त एसटी.

चालकाचे नियंत्रण सुटून
कोंडयेत एसटीला अपघात
कणकवली, ता. ३ : कंटेनरला बाजू देत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या दिशादर्शक फलकाला धडकली.
कणकवली-फोंडाघाट मार्गावर कोंडये गावात शुक्रवारी (ता. २) रात्री पावणे बाराच्या दरम्‍यान हा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
कणकवली आगारातील चालक हरिदास पांडुरंग पाटील हे लातूर ते कणकवली, अशी बस घेऊन येत होते. रात्री पावणे बाराच्या सुमारास कणकवली फोंडाघाट मार्गावरील कोंडये फाटा येथे बस आल्‍यानंतर समोरून भरधाव जाणाऱ्या कंटेनरला बाजू देण्यासाठी श्री.पाटील यांनी बस बाजूला घेतली. यावेळी नियंत्रण सुटल्‍याने रस्त्यालगतच्या मोकळ्या भागात बस गेली. यावेळी दिशादर्शक फलकाला धडकून बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. अपघातात प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. अन्य वाहनातून कणकवली पर्यंतच्या प्रवासाची व्यवस्था एसटी विभागाने केली. या अपघाताची माहिती चालक हरिदास पाटील याने फोंडाघाट दूरक्षेत्राला दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92991 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..