कोकणातील रस्ते खड्डेमुक्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातील रस्ते खड्डेमुक्त करा
कोकणातील रस्ते खड्डेमुक्त करा

कोकणातील रस्ते खड्डेमुक्त करा

sakal_logo
By

47478
मालवण ः सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करताना पर्यटन व्यावसायिक महासंघाचे पदाधिकारी.


कोकणातील रस्ते खड्डेमुक्त करा

मंत्री चव्हाणांना साकडे; पर्यटन व्यावसायिकांनी घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : कोकणच्या शाश्वत पर्यटनवाढीसाठी सुरक्षित व खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती व्हावी, अशी मागणी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदी चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या व तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकांऱ्यानी चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी कोकणात पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामीण व शहरी पर्यटनस्थळावर पोहोचण्यासाठी खड्डेमुक्त व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती होण्यासंबंधी कार्यवाही व्हावी, अशी विनंती केली. मागील सरकारच्या काळात बंदर विकासमंत्री म्हणून चव्हाण यांच्या माध्यमातून कोकणात नव्याने बंदरजेटींची निर्मिती केली. त्यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी नव्याने उभारण्यात आलेली जेटी अशाप्रकारच्या अनेक जेटीमुळे कोकणात सुरक्षित जलपर्यटन होण्यास मदत झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, यावेळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, मालवण वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष किसन मांजरेकर, टी.टी.डी.एस. अध्यक्ष सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, दादा वेंगुर्लेकर, रामा चोपडेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
--
चव्हाणांमुळे पर्यटनवृद्धी शक्य
कोकणातील असलेले मंत्री चव्हाण यांच्यामुळे बहुचर्चित मुंबई-गोवा महामार्ग, तसेच पर्यटनवाढीसाठी आवश्यक रस्त्यांचे जाळे कोकणात निर्माण होईल, तसेच सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास महासंघाच्या वतीने अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92994 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..