दुर्धर अजारग्रस्त रुग्णांना पावणेतीन कोटींची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्धर अजारग्रस्त रुग्णांना
पावणेतीन कोटींची मदत
दुर्धर अजारग्रस्त रुग्णांना पावणेतीन कोटींची मदत

दुर्धर अजारग्रस्त रुग्णांना पावणेतीन कोटींची मदत

sakal_logo
By

दुर्धर अजारग्रस्त रुग्णांना
पावणेतीन कोटींची मदत

१ हजार २१८ जणांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः जिल्हा परिषदच्या वतीने जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्णांना मदतीचा हात दिला असून, ९ वर्षांत जिल्ह्यातील १२१८ दुर्धर आजारी रुग्णांना १ कोटी ७५ लाख २६ हजार २५२ रुपये आर्थिक मदत दिली आहे.
जिल्ह्यातील दुर्धर आजारग्रस्तांना प्राथमिक औषधोपचारसाठी मदतीचा हात देता येण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे स्व-निधीतून आर्थिक साहाय्य योजना २०१३ मध्ये कार्यान्वित केली. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनेक लाभार्थीना दिला आहे. त्यासाठी आतापर्यंत १ कोटी ७५ लाख २६ हजार २५२ रुपये निधी खर्च केला आहे. कॅन्सर, हृदयरोग, किडनी रोग आदी दुर्धर आजारग्रस्तांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते. चालू आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये आतापर्यंत २० प्रस्ताव प्राप्त असून, या सर्व प्रस्तावाना मंजुरी दिली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे. जिल्हा परिषद स्व-निधीतून दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक साहाय्य करणारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पहिलीच आहे. ९ वर्षांत अनेकांना लाभ देऊन कोट्यवधी निधी खर्च केला आहे, असे सहायक आरोग्य अधिकारी संदेश कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93005 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..