रत्नागिरी-राजेंद्र आयरे यांचा हीरक महोत्सवी सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-राजेंद्र आयरे यांचा हीरक महोत्सवी सत्कार
रत्नागिरी-राजेंद्र आयरे यांचा हीरक महोत्सवी सत्कार

रत्नागिरी-राजेंद्र आयरे यांचा हीरक महोत्सवी सत्कार

sakal_logo
By

राजेंद्र आयरेंचा आज सत्कार
रत्नागिरी, ता. ३ ः बहुजन समाज पक्षाचे महाप्रदेश सचिव तसेच कोकण-मुंबई झोनचे प्रभारी राजेंद्र आयरे यांच्या ६०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा रविवारी (ता. ४ ) दुपारी तीन वाजता साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ कार्यालयात बहुजन समाज पक्ष व मित्रमंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयातील जीवनात कांशीरामजींच्या बामसेफ - दलित - शोषित संघर्ष समिती, बुद्धिस्ट रिसर्च सेंटर आणि बहुजन समाज पक्षाच्या स्वाभिमान न विकणाऱ्या चळवळीत तयार झालेले आयरे यांनी बहुजन समाज पक्षाच्या स्वाभिमानी चळवळीची ऊर्जा जिल्ह्यात निर्माण केली. आपले जीवन बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित करत आले आहेत. आयरे यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी आणि मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93022 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..