मुचकुंदी पुलाच्या वाढीव निधीचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुचकुंदी पुलाच्या वाढीव निधीचा तुटवडा
मुचकुंदी पुलाच्या वाढीव निधीचा तुटवडा

मुचकुंदी पुलाच्या वाढीव निधीचा तुटवडा

sakal_logo
By

rat३p११.jpg
47485
लांजाः नाबार्ड २८ अंतर्गत प्रस्तावित मुचकुंदी नदीवरील पुलाच्या वाढीव निधीसाठी मंजुरी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
----------------------
मुचकुंदी पुलासाठी वाढीव निधी द्या
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना साकडे; नाबार्ड २८ अंतर्गत मंजुरी शक्य
लांजा, ता. ३ः प्रस्तावित मुचकुंदी नदीवरील पुलाच्या वाढीव निधीकरिता शिफारस पत्र आणि मंजुरी नाबार्ड २८ अंतर्गत मिळावी, अशी मागणी मुचकुंदी परिसर विकास संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले. जोड रस्ता आणि अनुषंगिक खर्च यांचा समावेश मूळ अंदाजपत्रकात नाही. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होऊनही तो सुरू करता येणार नाही. त्यामुळे वाढीव निधीची गरज लागणार आहे.
मुचकुंदी नदीवर गोळवशी वडदहसोळ पुलाचा पाया बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गोळवशी येथील विद्यार्थ्यांना वडदहसोळ येथील हायस्कूलला जाण्यासाठी भर पावसाळ्यात होडीतून प्रवास करावा लागतो आणि म्हणूनच या नदीवर या ठिकाणी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून या नदीवरील पुलाला मंजुरी मिळाली होती आणि त्याचे काम सध्या सुरू आहे.
सुधारित सर्वसाधारण नवीन रचना आराखड्यानुसार दोन्ही बाजूस मिळून ३९० मीटरचा जोड रस्ता आणि लांजा गोळवशी बाजूला १५.५० मीटर प्रस्तावित बॉक्ससेलबाबतची तरतूद मूळ अंदाजपत्रिकेत समाविष्ट नसल्याने पुढे लागणाऱ्या वाढीव निधीकरिता तुटवडा येणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत यांना तसेच माजी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना हे काम नाबार्ड २६ मध्ये समाविष्ट करण्यासंबंधी यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला होता. ‌ दरम्यान, नाबार्ड २८ अंतर्गत हे काम प्रस्तावित झाले असून त्याला मंजुरी बाकी आहे. त्यामुळे आपण हे काम मार्गी लावावे, अशी आहे मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना हे निवेदन सादर करताना मुचकुंदी परिसर विकास संस्थेचे पदाधिकारी जयेश माजळकर, महेश वीर, रवींद्र कांबळे, आकाश पवार, उदित खानविलकर, गणेश खानविलकर, विजय म्हादये, प्रशांत भितळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93024 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..