सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे यश
सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे यश

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे यश

sakal_logo
By

47503
मालवण ः युवा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना प्राचार्य उज्‍ज्वला सामंत.

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे यश
मालवण : कुडाळात झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चार विभागात यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्या डॉ. उज्‍ज्वला सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य स्पर्धा-तृतीय क्रमांक-रिना मराळ, तेजस कातवणकर, विजया कांदळगावकर, मिथिल मोर्वेकर, चैतन्य ठाकूर, तेजस पोळ, दीपशिखा रेवंडकर, राहुल जाधव, श्रुती राऊळ, धनेश्वरी लाड, नृत्य दिग्दर्शक-भूषण पाटील, रोहित माने. तालवाद्य स्पर्धा-द्वितीय क्रमांक-रथराज तुरी. रांगोळी स्पर्धा-द्वितीय क्रमांक-ममता वायंगणकर, वक्तृत्व स्पर्धा-ग्रुप बी हिंदी-प्रथम क्रमांक-शर्मा रामनारायण या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रा. हंबीरराव चौगले, प्रा. प्रमोद खरात, प्रा. वैशाली पाटकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
................
मालवणच्या शेतकऱ्यांना आवाहन
मालवण : पीएम किसान लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यास पुढचा लाभ मिळणार नाही. या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण तत्काळ करून घ्यावे. यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत वाढवून ७ सप्टेंबरपर्यंत वाढीव मुदत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. ‘केवायसी’साठी मोबाईलसह महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये सुविधा उपलब्ध आहे. दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंतही ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन पाटणे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93025 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..