संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

गव्हेत घराला आग, आमदार कदमांकडून पाहणी
दाभोळ ः दापोली तालुक्यातील गव्हे पहिलीवाडी येथील समीर जोशी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे नुकतीच आग लागली होती. त्यामुळे त्यांचे खुप मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ही घटना समजताच आमदार योगेश कदम यांनी त्यांच्या घरी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी हातभार म्हणून आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.


मांदिवली रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने भरले
दाभोळ ः दापोली तालुक्यातील मांदिवली, आमखोल, डौलीला जाणार्‍या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही रस्त्यावरील खड्डे भरले जात नसल्याने अखेर केळशी येथील सामाजिक कार्यकर्ते मेहबूब मुकादम यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने खड्डे भरण्यास सुरवात केली आहे. गणपती सण सुरू आहे. मुंबई, पुणे येथून अनेक चाकरमानी गावी येत आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना नादुरुस्त रस्ता ही एक समस्या त्यांच्यापुढे उभी आहे. त्यामुळे मुकादम यांनी आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू करत रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मेहबूब मुकादम यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.
---------

मुरुड रस्त्यावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले
दाभोळ ः गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दापोली तालुक्यातील मुरूड गावातील मुख्य मार्गावर पडलेले खड्डे अखेर ग्रामस्थांनी श्रमदानातून रात्रीच्या सुमारास भरले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दापोली तालुक्यातील आसूद ते मुरूड या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यामध्ये मुरूड गावातील रस्त्यावरील खड्डे स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करून भरले आहेत; परंतु आसूद हद्दीतील खड्डे जैसे थे आहेत. त्यामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


दापोलीत वाहतूक कोंडी टाळण्याचे प्रयत्न
दाभोळ ः गणेशोत्सवासाठी दापोलीत चाकरमानी मोठ्या संख्येने आले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या गाड्यांची गर्दी झाली आहे. यामुळे वाहतूककोंडी होऊ नये म्हणून दापोली पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील गावोगावी गणपती बाप्पांचे आगमन होत असल्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातून नागरिक दापोली शहरात गाड्या घेऊन येत आहेत. यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होताना दिसत होती. त्याचबरोबर मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यांमधून चाकरमानी गावात आले आहेत. यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने खासगी गाड्या, बसेस यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याला वाहतूककोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्याचा प्रयत्न दापोली पोलिस ठाण्यामार्फत सुरू आहे. दापोली पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे हेडकॉन्स्टेबल देवानंद बोरकर व भूषण सावंत हे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेहनत घेत आहेत. इतर पोलिस अधिकारी व होमगार्ड मुख्य शहरातील ठिकाणांवर उभे राहून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दापोली कृषी महाविद्यालयात क्रीडा दिन
दाभोळ ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या जीमखाना विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला. या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतुल मोहोड यांनी विद्यार्थ्यांना व कर्मचारी वर्गाला राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. मकरंद जोशी, शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. मोहित शिंदे, सहाय्यक कुलसचिव गुजर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93051 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..