रत्नागिरी- रत्नागिरीत पौराणिक देखाव्यांची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- रत्नागिरीत पौराणिक देखाव्यांची परंपरा
रत्नागिरी- रत्नागिरीत पौराणिक देखाव्यांची परंपरा

रत्नागिरी- रत्नागिरीत पौराणिक देखाव्यांची परंपरा

sakal_logo
By

rat3p20.jpg-
47498
रत्नागिरी ः शहराजवळील भाटीमिऱ्या येथील ओंकार कांबळे यांनी घरगुती गणेशोत्सवात महाशिवरात्रीचा पौराणिक देखावा साकारला आहे. त्यातील भगवान शंकर पहिल्या छायाचित्रात आणि दुसऱ्या छायाचित्रात शिकारी.
---------------------------
रत्नागिरीत पौराणिक देखाव्यांची परंपरा
ओंकार कांबळे ; महाराशिवरात्रीच्या माहात्म्याचा देखावा
रत्नागिरी, ता.३ ः लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्ययुद्धात जनजागरण करण्याकरिता गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास सुरवात केली. मग यात पौराणिक देखावे, ऐतिहासिक देखावेसुद्धा लोक करू लागले. त्यातून स्वातंत्र्ययुद्धाची ठिणगी पडली. आजही या देखाव्यांची भुरळ आहे. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे असे देखावे केले जातात; परंतु कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात पौराणिक देखाव्यांना जास्त पसंती आहे. असाच महाशिवरात्रीच्या माहात्म्याचा पौराणिक देखावा रत्नागिरी शहराजवळील भाटीमिऱ्या गावातील ओंकार कांबळे यांनी साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी ग्रामस्थ, रत्नागिरीकरांची गर्दी होत आहे.
कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन मोठे सण. या सणांसाठी मुंबईकर चाकरमानी हमखास गावी येणारच. ३१ ऑगस्टला घरोघरी गणपतीबाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. गणपतीसाठी आकर्षक आरास, सजावटही करण्यात आली. त्यासाठी घरगुती मखर आणि हस्तकौशल्यातून बनवलेल्या आखीव रेखीव कलाकृतीही पाहायला मिळत आहेत. भाटिमिऱ्या येथील कांबळे कुटुंबीयांनी तर प्रतिवर्षाप्रमाणे घरगुती गणेशोत्सवात पौराणिक देखावा साकारला आहे. गणेशोत्सवात देखावे उभारण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू आहे. आजकाल गणेश सजावट स्पर्धामुळे हे देखावे सर्वांसमोर येत आहेत.
कांबळे कुटुंबीयांनी गोकुळाष्टमीनंतर गणेशोत्सवाच्या तयारीला सुरवात केली. घरातील मंडळी एकत्र येऊन यंदा काय देखावा उभारायचा यावर चर्चा केली. मोजकेच दिवस हातात असतानाही रात्रभर जागून कांबळे कुटुंबाने महाशिवरात्रीचा देखावा उभारला आहे. देखाव्यांसाठी खास पडदे रंगवले आहेत. संगीत नाटकांप्रमाणे पौराणिक देखावे आवडीने साकारला. हा देखावा विशेष म्हणजे पर्यावरणपूरक बनवला आहे. यात कुठेही प्लास्टिक किंवा थर्माकॉलचा वापर केलेला नाही.

चौकट
गणेश सजावटीमध्ये बक्षीस
पौराणिक देखाव्यामुळे कांबळे यांच्या घरातील एक खोली व्यापून गेली आहे. देखाव्यात प्रकाशझोतांचा योग्य उपयोग करून तो देखावे अधिक आकर्षक केला आहे. ओंकार कांबळे यांच्याघरी दरवर्षी पौराणिक देखावे उभारण्याची प्रथा गेली अनेक वर्षे जपली जात आहे. त्यांनी विविध संस्थांनी आयोजित केलेल्या गणेश सजावट स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93054 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..