‘आली गवर आली सोनं पावली आली’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आली गवर आली सोनं पावली आली’
‘आली गवर आली सोनं पावली आली’

‘आली गवर आली सोनं पावली आली’

sakal_logo
By

47530
47531
ॉखारेपाटण : येथील तळी, विहिरींच्या ठिकाणी गौराईंचे पूजन झाले. त्‍यानंतर वाजतगाजत गौराईंना घरी आणताना सुवासिनी व मुली.
(छायाचित्र : रमेश जामसंडेकर)
--
47447
भिरवंडे ः येथील खलांतर-मधलीवाडी येथे विहिरीवर पूजन करून पारंपरिक पद्धतीने गौराई घरोघरी नेताना सुवासिनी. (छायाचित्र ः तुषार सावंत)


‘आली गवर आली, सोनपावली आली’
---
जिल्ह्यात गौराईंचे आगमन; उद्या पूजन, रंगणार महिलांच्या फुगड्या
कणकवली, ता. ३ : ‘आली गवर आली, सोनपावली आली...’ आदी गीते एकसुरात गात आज गौराईंचे घराघरांमध्ये स्वागत करण्यात आले. यामुळे
गणेशोत्सवात रंगत वाढली असून, आज नद्या, तळी आणि विहिरीवरून गौराईंचे वाजतगाजत आगमन झाले. उद्या (ता. ४) विधीवत पूजन होणार असून, सोमवारी (ता. ५) अनेक भागांत गौराईंसह गणरायांना निरोप दिला जाणार आहे. त्‍यामुळे आज आणि उद्याच्या रात्री महिलांच्या फुगड्या रंगणार आहेत.
गणेश चतुर्थीनंतर यंदा चौथ्या दिवशी ज्‍येष्‍ठा गौराईंचे आगमन झाले. त्‍यासाठी सकाळपासून महिला वर्गाची धावपळ सुरू होती. आज दुपारपर्यंत तळी, विहिरी, नदी, ओढे या ठिकाणचे खडे तसेच प्रथेनुसार मुखवटे घेऊन गौराईंना आणण्यात आले. उद्या गौरीपूजन होणार आहे; तर गौरी-गणपती विसर्जनापर्यंत गौर जागविण्याचा कार्यक्रम सुरू राहील. उद्या गौराईंचे पूजन झाल्यावर विविध पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. यात पावसाळ्यात उपलब्ध असणारा शेवगा, कुर्डू आदी प्रकारच्या पाच पालेभाज्यांचा समावेश असेल. अनेक घरांच्या कुलपरंपरेनुसार मटणाचाही नैवेद्य दाखविला जाणार आहे.

साहित्यही विक्रीसाठी
जिल्ह्यात गौरीपूजनासाठी विविध आकाराच्या गौराईमूर्ती तथा मुखवटे गणेशमूर्ती शाळांत तसेच बाजारपेठांत उपलब्ध होतात; तर काहींनी आपल्या घरातील पारंपरिक गौरी मुखवटे पूजेसाठी उभारले होते. गौराई उभ्या करण्यासाठी स्थानिकांनी तसेच नामांकित कंपन्यांनी लाकडी, प्लास्टिक आणि लोखंडी तारांचे स्टॅण्ड बाजारात विक्रीसाठी आणले होते.

47514
नांदगाव ः घरोघरी सोनपावलांनी झालेले गौराईंचे आगमन.

नांदगाव परिसरातही उत्साह
नांदगाव ः येथील परिसरात गौराईंचे आज सोनपावलांनी आगमन झाले. या वेळी महिलांचा आनंद ओसंडून वाहत होता. कोकणातील गौरी-गणपतीची आतुरता असते. त्यातच महिलांना गौराईचा सण जिव्हाळ्याचा विषय. कामात किती व्यस्त असल्या तरी फुगड्याचे गीत कानावर पडताच थकवा दूर झाल्यासारखे होते. रविवारी आपल्या लाडक्या गौराईसाठी आवडीचा नैवेद्य देण्यात आला. रात्री फुगड्यांनी परिसर दणाणून गेला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93063 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..