रत्नागिरी- गौरीपूजन, औसासाठी नवविवाहिता सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- गौरीपूजन, औसासाठी नवविवाहिता सज्ज
रत्नागिरी- गौरीपूजन, औसासाठी नवविवाहिता सज्ज

रत्नागिरी- गौरीपूजन, औसासाठी नवविवाहिता सज्ज

sakal_logo
By

rat३p१८.jpg
४७४९६
रत्नागिरीः बाजारपेठेत औसांसाठी सुपे, शिपली विकणाऱ्या महिला तर दुसऱ्या छायाचित्रात धनजीनाक्यावर काकड्या, चिबूड आणि गावठी भाज्या विकणाऱ्या महिला.
rat३p१९.jpg
४७४९७
पांगरी (ता. संगमेश्वर)ः येथे सजवलेली पितळेची गौराई तर दुसऱ्या छायाचित्रात लाखडी मुखवट्याची उभी गौराई, तिसऱ्या छायाचित्रात मिरजोळे येथे गौरी आवाहन करताना सुवासिनी, मुली.
----------------------
गौरीपूजन, औसासाठी नवविवाहिता आतूर
ज्येष्ठा गौरींना आवाहन; आज तिखटा नैवेद्य
रत्नागिरी, ता. ३ः जिल्हा गणेशमय झाला असतानाच आज ज्येष्ठा गौरींना आवाहन करण्यात आले. खड्यांची गौरी आणि काही घराण्यांत मुखवट्याची उभी गौर सजवण्यात येत आहे. कोकणात अनेक ठिकाणी गौरीचे औसे काढले जातात. गौरीच्या या औसांसाठी आता नवविवाहिता सज्ज झाल्या आहेत. या औसांना मोठी परंपरा लाभली आहे. उद्या (ता. ४) रविवार असल्यामुळे गौरीला तिखटा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. तर अनेक घरांमध्ये गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जाईल.
उभ्या गौरी, धातूच्या, मातीच्या गौरी आणि काही ठिकाणी नदी, वहाळातील पाच किंवा सात खडे आणून गौरी आवाहन करण्यात आले. मुखवट्याच्या उभ्या गौरीला साडी नेसवली जाणार आहे. मुकुट, नथ, बांगड्या, मंगळसूत्र, माळा, कंबरपट्टा अशा दागिन्यांनी सजवण्यासाठी सुवासिनींनीमध्ये लगबग सुरू होती. गणपतीच्या जवळच गौर सजवण्यात येणार आहे. ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचे रूप. या गौरीला आज पारंपरिक पद्धतीने आवाहन करण्यात आले. अनेक ठिकाणी नदीतील खडे आणून गौरीपूजन करण्याची प्रथा असून गौरीचा मुखवटा सजवण्याची प्रथाही जपण्यात येणार आहे. गौरींच आगमन पूर्वा नक्षत्र असताना होते तेव्हाच्या वर्षी साजरे केले जातात ते गौरींचे औसे केले जातात. गौरीच्या औसानाही कोकणच्या परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे.
गणरायांच्या पाठोपाठ ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर प्रत्येक घरात मोठ्या उत्साहात आगमनकर्त्या होतात. या दोन्ही गौरींचे आगमन हे प्रत्येक घरातील सवाष्ण स्त्रीसाठी एक आपुलकीचं लेणं असतं. ज्येष्ठा गौरीचा सण म्हणजे तिच्या माहेरी येण्याचा आनंदोत्सव. भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते, म्हणून याला ज्येष्ठा गौरी म्हटले जाते.
--------------------------
चौकट १
औसासाठी बाजारपेठेत वर्दळ
औसाच्या खरेदीसाठी आज बाजारपेठेत वर्दळ पाहायला मिळाली. औसांकरिता लागणारी सुपे, शिपली ८०० ते ९०० रुपयांना विकली जात होती. काही ठिकाणी मोठी सुपेही खरेदीसाठी नवविवाहिता दिसल्या. औसाच्या दिवशी सुपांमध्ये काकडी, पडवळ, दोडका, घोसाळे अशा फळभाज्या, पाच प्रकारची फळे, खोबर्‍याची वाटी आणि विडे ठेवले जातात. प्रथम घरच्या देवाला विडा ठेवून नवरदेवांना मान मिळतो. त्यानंतर घरातील ज्येष्ठांना विडे देऊन वाडीतील ठरलेल्या घरांमध्ये विडे दिले जातात. नंतर नववधू पतिदेवांसह माहेरी जाते. माहेरी आलेल्या या नवरीचं थाटात स्वागत केलं जातं. माहेरच्या मंडळींना विडे दिल्यानंतर माहेरवाशिणीची पाठवणी करतात. तिला लागणारी एखादी संसारोपयोगी वस्तू अथवा ऐपतीप्रमाणे काहीतरी वस्तू अथवा दागिना दिला जातोच. साधारण पाच घरांमध्ये औसा नेला जातो. त्या त्या ठिकाणी पाठवणी होतेच. काही ठिकाणी ही सुपं ठेवून घेतली जातात तर काही ठिकाणी परत पाठवली जातात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93064 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..