सिंधुदुर्गात सहा महिन्यांत पर्यावरणपूरक उद्योग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात सहा महिन्यांत 
पर्यावरणपूरक उद्योग
सिंधुदुर्गात सहा महिन्यांत पर्यावरणपूरक उद्योग

सिंधुदुर्गात सहा महिन्यांत पर्यावरणपूरक उद्योग

sakal_logo
By

सिंधुदुर्गात सहा महिन्यांत
पर्यावरणपूरक उद्योग
उदय सामंत; आडाळीत मोठे उद्योग आणू
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ ः जिल्ह्यासह कोकणात येत्या सहा महिन्यांत पर्यावरणपूरक उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. देशाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून २५ हजार नवीन उद्योजकांच्या माध्यमातून सुमारे ७५ हजार लोकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते, मंत्रिपद स्वीकारल्यानंतर चतुर्थीच्या निमित्ताने प्रथमच वेंगुर्लेत निवासस्थानी आले होते. या वेळी सामंत म्हणाले, ‘‘आडाळी, कासार्डे व वैभववाडी औद्योगिक वसाहती पुनर्जीवित करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने लवकरच बैठक घेऊ. मंत्रिपदाच्या माध्यमातून कोकणाच्या विकासासाठी ताकदीने प्रयत्न करणार आहे. आडाळी-दोडामार्ग येथे उपलब्ध जागेत मोठे उद्योग आणण्याचा मानस आहे. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा होईल. आंतराष्ट्रीय मोपा एअरपोर्ट होत असल्याने गोव्यातील बरेचसे उद्योजक येथे येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना उद्योग उभारण्यासाठी जमिनी देताना ८० टक्के रोजगार स्थानिकांना मिळाला पाहिजे, अशी अट असेल. त्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न होतील. याची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यांत होईल.’’
ते म्हणाले, ‘‘कासार्डे औद्योगिक वसाहतीत फूड प्रोसेसिंग युनिट सुरू केले जाईल. केंद्रीय मंत्र्यांच्या खात्याच्या माध्यमातून कॉलेजसारखा प्रकल्प उभारता येऊ शकतो का, याचाही विचार सुरू आहे. वैभववाडी वसाहतीत ३० एकर जागा उपलब्ध आहे. ही सर्व जागा एका उद्योजकाला किंवा १५ एकर मिळून दोन उद्योजकांना देऊन तेथे साखर कारखान्यासारखे उद्योग येण्यासाठी प्रयत्न आहेत."

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93070 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..