सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन, तरुणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन, तरुणावर गुन्हा
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन, तरुणावर गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन, तरुणावर गुन्हा

sakal_logo
By

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन, तरुणावर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन अल्लाउद्दीन सारंग (वय २१, रा. कोकणनगर, अन्सार चौक, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १) रात्री साडेनऊच्या सुमारास साळवी स्टॉप येथील बिअर शॉपीच्या समोरील उघड्या जागेवर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सारंग साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी बिअर पीत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस नाईक विलास जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार पाटील करत आहेत.
--------
बेशुद्धावस्थेत सापडलेल्या वृद्धाचा मृ्त्यू
रत्नागिरी ः कुवारबाव रेल्वे स्टेशन येथे बेशुद्धावस्थेत पडलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अजित मधुसुदन पुनाळे (वय ६५, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनाळे हे दोन्ही पायाने अशक्त असल्याने बेशुद्धावस्थेत २८ ऑगस्टला कुवारबाव रेल्वे स्टेशन येथे सापडले होते. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र शुक्रवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. टेकाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.
-------
कशेळी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील कशेळी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. कशेळी गावचे पोलिस पाटील राजन आगवेकर यांच्या गायीवर भर दुपारी बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शुक्रवारी (ता. २) दुपारी तीनच्या सुमारास आगवेकर यांची गाय कशेळी परिसरातील सड्यावर चरायला सोडलेली असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला त्यात ती ठार झाली. या आधीही असे हल्ले परिसरात जनावरांवर झाले आहेत. वनविभागाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी कशेळी ग्रामस्थांनी केली आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------
नाटे बाजारपेठ येथे विदेशी दारू जप्त
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठ ते सडा पेठ येथील पायवाटेवर ७४० रुपयांची विविध प्रकारची विदेशी दारू जवळ बाळगणाऱ्याविरुद्ध नाटे सागरी सुरक्षा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संदीप सुधाकर बंदरकर (वय ३३, रा. नाटे सडापेठ, ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताकडे ७४० रुपयांच्या विदेशी दारू मॅकडॉल, डीएसपी ब्लॅक, गोवा जीन अशा बाटल्या विक्रीकरिता जवळ बाळगल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर कोरे यांनी नाटे पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार झगडे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93082 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..