विसर्जनादरम्यान दक्षता घ्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जनादरम्यान दक्षता घ्यावी
विसर्जनादरम्यान दक्षता घ्यावी

विसर्जनादरम्यान दक्षता घ्यावी

sakal_logo
By

47558
कुडाळ ः भंगसाळ नदीपात्र येथील गणेश घाटाची पाहणी करताना तहसीलदार अमोल पाठक, पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

विसर्जनादरम्यान दक्षता घ्यावी

तहसीलदार पाठक ः भंगसाळ नदीपात्राची संयुक्त पाहणी

कुडाळ, ता. ३ ः येथील भंगसाळ नदीपात्रात मगरीचे असलेले वास्तव्य व गणेश विसर्जनाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तरीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे गणेशभक्तांनी काटेकोर पालन करून योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केले. या ठिकाणी वनविभागाचे दोन व नगरपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
भंगसाळ नदीपात्रात मगरीचे वास्तव असून त्यांची संख्या वाढत चालली आहे. सद्यस्थितीत सुमारे दहा ते बारा मगरींचे वास्तव नदीपात्रात असल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीत गणेशोत्सव सुरू असून कुडाळ शहरातील बहुतांश प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन भंगसाळ नदीपात्रात करण्यात येत आहे. या अनुषंगाने गणेश चतुर्थी नियोजन बैठकीत काही जणांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. यावेळी लवकरच तहसीलदार, पोलिस निरीक्षक, वनविभाग व नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने संयुक्त पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन या बैठकीत दिले होते. यानुसार तहसीलदार पाठक यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्तिक भेट देऊन गणपती विसर्जन स्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पाठक म्हणाले की, भंगसाळ नदीपात्र खूप मोठे असून या भागात मगरी एका जागेवर स्थिर नसतात. त्यामुळे उपाययोजना करत असताना अनेक तांत्रिक अडचणी आहेत. या अनुषंगाने प्राथमिक टप्प्यात दोन वन विभागाचे कर्मचारी तसेच नगरपंचायत व पोलिस कर्मचारी कार्यरत ठेवण्यात येणार आहे. माहितगार तसेच पोहणाऱ्या तीन-चार व्यक्तींनाच नदीपात्रात उतरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. विसर्जनाच्या दरम्यान फटाक्यांचा आवाज व गणेशभक्तांचा कोलाहल यामुळे मगरी या भागात फिरकणे कठिण आहे; मात्र तरीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे गणेशभक्तांनी काटेकोर पालन करून योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्याचे पाठक यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93090 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..