रत्नागिरी ः 100 जागांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः 100 जागांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत
रत्नागिरी ः 100 जागांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत

रत्नागिरी ः 100 जागांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत

sakal_logo
By

- rat3p8.jpg-
47464
रत्नागिरी ः येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाची इमारत.

- rat3p9.jpg-
47465
उदय सामंत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० जागा
---
शासन निर्णय जारी; २१ एकर जागा, ५२२ कोटी ५७ लाख निधी
रत्नागिरी, ता. ३ ः जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला रुग्णालय आणि मनोरुग्णालयाच्या मिळून २१ एकर जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून, त्याला ५२२ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्यावर त्वरित २ ऑगस्टला शासन निर्णय जाहीर झाला आहे. या महाविद्यालयासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांप्रमाणे एक हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर आवश्यक आहे. महाराष्ट्रात ते प्रमाण ०.८४ इतके आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण असल्याने येथे दर्जेदार व परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्यसेवेची रुग्णालये आहेत. परंतु, जिल्ह्याला आरोग्य व्यवस्था पुरविण्यास अडचण निर्माण होते. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार काल (ता. २) शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय असे करण्यास मान्यता देण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालयाची ४.७५ एकर जागा, महिला रुग्णालयाची २.७५ एकर जागा तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयाची १४.३२६ एकर जागा अशी एकूण २१.८२ एकर जागा तीन वर्षांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित जिल्हा रुग्णालयासाठी निःशुल्क वापरास देण्यास आली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेपैकी चार एकर जागा महाविद्यालयाच्या प्रस्तावित इमारतीसाठी राखीव ठेवली आहे. आवश्यक तेवढी पदनिर्मिती करून ती तत्काळ भरण्यात येईल, तसेच श्रेणीवर्धित जिल्हा सामान्य रुग्णालयासाठीही पदनिर्मिती केली जाणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता होण्यासाठी २३० रुग्ण खाटांचे जिल्हा रुग्णालय, १०० रुग्ण खाटांचे महिला रुग्णालय आणि ३६५ रुग्ण खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय अशी एकूण ६९५ रुग्ण खाटांची तिन्ही रुग्णालये स्थावर जंगम मालमत्तेसह निःशुल्क वापरण्यात येणार आहेत.
----------------
चौकट
कायमस्वरूपी जागेसाठी २० एकर जागा शोधा
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नियमानुसार आवश्यक किमान २० एकर जागा रुग्णालयापासून १० किलोमीटरच्या परिघात उपलब्ध करून घेण्यात येऊन त्या जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93102 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..