रत्नागिरी-नगराध्यक्षपदासाठी राहुल पंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-नगराध्यक्षपदासाठी राहुल पंडित
रत्नागिरी-नगराध्यक्षपदासाठी राहुल पंडित

रत्नागिरी-नगराध्यक्षपदासाठी राहुल पंडित

sakal_logo
By

रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी राहूल पंडित
एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार ; लवकरच शिक्कामोर्तब
रत्नागिरी, ता. ३ ः आगामी पालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून राहूल पंडित यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात असून आरक्षण सोडतीनंतर यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. पंडित २०१६ साली शिवसेनेकडून थेट नगराध्यक्षपदासाठी निवडून आले होते; परंतु पक्षादेशामुळे त्यांना अडीच वर्षातच राजीनामा द्यावा लागला. अर्धवट राहिलेली कारकीर्द ते शिंदे गटाकडून पूर्ण करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राहूल पंडित यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन ‘मी पुन्हा येईन’ असे सुचित केले होते. खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू सहकारी आणि कट्टर शिवसैनिक म्हणून पंडित यांची ओळख होती; मात्र सध्याच्या शिवसेनेतील राजकीय घडामोडींमध्ये पंडित यांनी शिंदे गटात गेलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सलगी करण्यास सुरवात केली होती. त्यानंतरच शिवसेनेकडून जिल्हा समन्वयकपदावरुन पंडित यांना हटवून संजय पुनसकर यांची नेमणूक केली. या निर्णयानंतर पंडित शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याला शिंदे गटातील काही निकटवर्तीयांकडूनही दुजोरा मिळत आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील त्यांचा अनुभव पाहता शिंदे गटाकडून त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, त्यांची अडीच वर्षाची कारकीर्द कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली होती. त्यात शहरातील सुधारित नळपाणी योजनेची अंमलबजावणीसह विविध विकासकामांचा समावेश होता. मागील लोकसभा निवडणुकीवेळी पंडित यांच्याकडे विशेष जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली होती. त्या काळात कायद्यातील तरतुदीनुसार तीन महिने रजेवरही पाठवण्यात आले होते. तीन महिन्यांनी पंडित हे कागदोपत्री हजर झाले. तरीही त्यावेळी पडद्याआडून पालिकेचा कारभार बंड्या साळवीच पाहत होते. पुढे त्यांनी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचरणी राजीनामा ठेवल्यानंतर चर्चेला उधाण आले. पक्षांतर्गत झालेली राजीनाम्याची तडजोड नागरिकांना तितकीश रुचलेली नव्हती. त्यानंतर चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी विजयी झालेले होते.
-----------------
कोट
रत्नागिरी शहराच्या विकासासाठी मी पुन्हा येईनच; मात्र अडीच वर्षांकरिता नव्हे तर पाच वर्षांसाठी. नगराध्यक्ष असताना शहरातील स्वच्छतेवर भर दिला होता. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी लढणार. येत्या काही दिवसात यावर निर्णय होइल.
- राहुल पंडित, माजी नगराध्यक्ष

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93103 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..