निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या संपर्कात ः उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या 
संपर्कात ः उदय सामंत
निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या संपर्कात ः उदय सामंत

निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या संपर्कात ः उदय सामंत

sakal_logo
By

47566
उदय सामंत

निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या
संपर्कात ः उदय सामंत

दोन गट झाले तरी सातबारा एकच

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ ः आम्ही निष्ठावंत म्हणणारे जिल्ह्यातील काही नेते, पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. लवकरच ते पक्ष प्रवेश करतील. कोर्टाच्या निकालामुळे ते गप्प आहेत, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केला. तसेच शिवसेनेत दोन गट झाले असले तरी ही वैचारिक दुरी आहे; मात्र आमचा सातबारा एकच आहे, असे सांगत काही झाले तरी आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
शिंदे गटातील प्रमुख समजले जाणारे व राज्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, निष्ठावंत म्हणणारे जिल्ह्यातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत. कोर्टाचा निकाल लागल्यानंतर ते आमच्यात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. तूर्तास त्यांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. येणाऱ्या काळात अनेकजण आमच्यासोबत असतील, याबाबत काही शंका नाही आणि पुढची परिस्थिती वेगळी असेल. आम्ही अजून शिवसेनेतच असून काही झाले तरी भाजपमध्ये जाणार नाही. आमचा सातबारा एकच आहे. जे काही आहे ते वैचारिक भांडण आहे, असे सांगून सातबारा भाऊ असले तर दोन भावांचे ऐकले जाते की आठ भावांचे ऐकले जाते, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित पत्रकारांना केला. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93108 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..