देवगड किल्ला गणपती मंदिर भाविकांसाठी आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड किल्ला गणपती मंदिर भाविकांसाठी आकर्षण
देवगड किल्ला गणपती मंदिर भाविकांसाठी आकर्षण

देवगड किल्ला गणपती मंदिर भाविकांसाठी आकर्षण

sakal_logo
By

47568
देवगड : जीर्णोद्धार केलेले गणपती मंदिर.
47569
दुसऱ्या छायाचित्रात किल्ला मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती.


मंदिराच्या सुंदरतेत जीर्णोद्धारामुळे भर

देवगड किल्ला गणपती मंदिर; नवे रूप पर्यटकांनाही भावतेय, दर्शनासाठी गर्दी

संतोष कुळकर्णी : सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ : येथील किल्ला भागातील श्री गणेश मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते. अलीकडे मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार झाल्याने मंदिराच्या आकर्षतेत अधिकच भर पडली आहे. दरवर्षी गणेश जयंती आणि दर महिन्यात येणाऱ्या संकष्टीला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने मंदिराच्या आकर्षतेत अधिक भर पडल्यामुळे पर्यटकांचा मोठा वावर असतो.
सभामंडप भव्य स्वरुपात उभारल्याने मंदिराच्या आकर्षणात अधिकच भर पडली आहे. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती रेखीव केली आहे. गाभारा आकर्षित केला असून गाभाऱ्याच्या सभोवताली फिरताना अष्टविनायकाचे दर्शन घडते. गणेशाच्या समोर मोठा उंदीर बसवला आहे. श्री गणेश जयंतीला मंदिरात मोठा उत्सव असतो. यावेळी पारंपरिक भजनांसह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिवसभर महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत असतात. दर महिन्याच्या संकष्टीला नित्यनियमाने येणारे काही भाविक आहेत. संकष्टीलाही रात्री महाप्रसाद असतो. यासाठी भाविकांची गर्दी असते. महाप्रसाद देणारे काही भाविक असतात. मंदिराच्या देखभालीसाठी स्थानिक मंडळ कार्यरत आहे. मंदिराची देखभाल स्थानिकांकडून पाहिली जाते. श्री गणपती मंदिर न्यास, देवगड किल्ला या न्यासाच्यावतीने मंदिराचे कामकाज चालते. किल्ला मंदिरातील श्री गणेशावर अनेकांची अपार श्रद्धा आहे. याच भावनेतून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक नित्यनियमाने येत असतात. आता मंदिर परिसर सुशोभित केला आहे. अलीकडे पर्यटकांचा देवगडकडे वाढता ओढा असतो. अशावेळी गणपती मंदिराची एकूणच रचना आणि त्याची भव्यता पर्यटकांना आकर्षित करून जाते. देवगड किल्ला परिसरात मंदिर असल्याने पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटक आवर्जून श्री गणेशाचे दर्शन घेतात. नव्याने केलेले मंदिर भव्यदिव्य असून त्याची रचनाही सुंदर आहे. आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर करून मंदिर आकर्षक बनवले आहे.
................
47567
सुरुवातीला मंदिर होते छोटे
सुरुवातीला छोट्या स्वरुपात मंदिराची रचना होती. मंदिर फार जुने आहे. सुरुवातीला मंदिरावर कौलारू छप्पर होते. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात मंदिराच्या कळसासह गाभाऱ्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. आता पुन्हा एकदा मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराचा कळस आकर्षक केला आहे.
------
चौकट
उत्सव काळात भाविकांची गर्दी
श्री गणपती मंदिराकडे जाणारा पक्का रस्ता आहे. त्यामुळे पर्यटकांची वाहने थेट मंदिरापर्यंत जातात. उत्सव काळात दूरचे भाविकही दर्शनासाठी येतात. श्री गणेशाला अनेकजण साकडे घालतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93109 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..