ताम्हणकरांना पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताम्हणकरांना पुरस्कार जाहीर
ताम्हणकरांना पुरस्कार जाहीर

ताम्हणकरांना पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

ताम्हणकरांना पुरस्कार जाहीर
मालवण ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून मसुरे येथील दाजीसाहेब प्रभुगावकर जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नं. १ या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले गुरुनाथ ताम्हणकर यांचा पुरस्कारात समावेश आहे. ताम्हणकरांनी देवली खालची, वेरली या शाळेत गेली वीस वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. विविध सहशालेय उपक्रम, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहभागी करून शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच ते कार्यरत असतात. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, सरपंच संदीप हडकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब, संग्राम प्रभुगावकर आदींनी अभिनंदन केले.
--
वरवडे शाळेस टीव्ही, प्रोजेक्टर
कणकवली ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वरवडे नं. १ या शाळेचे माजी विद्यार्थी संतोष सावंत, देवदास सावंत, सुनील सावंत, नवीन सावंत या बंधूंनी शाळेला स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टर भेट दिला. तसेच शाळेतील मुलांना वह्या व पेन्सिलचेही वाटप केले. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी सावंत बंधूंनी शाळेची भौतिक गरज ओळखून शाळेला या वस्तू भेट स्वरुपात दिल्या आहेत. त्याबद्दल शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. बीडवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती कवटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्मिता घाडी, सामाजिक कार्यकर्ते सोनू सावंत, धनंजय सावंत, ग्रामपंचायत सदस्या स्वप्नाली सावंत आदी उपस्थित होते.
--
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
वेंगुर्ले ः श्री गणेश चतुर्थी काळात रिलायन्सने आंबा विमा नुकसानभरपाई दिल्याबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी आभार मानले. आंबा, काजू नुकसान भरपाई विम्याची रक्कम गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीत देण्याची मागणी सातत्याने संघटनेच्यावतीने करण्यात येत होती व त्यासाठी आंबा बागायतदारांचे मेळावे, बैठका, उपोषणे सातत्याने चालू होते; मात्र रिलायन्सने आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांची न्याय मागणी मान्य करून गणेश चतुर्थी काळात विमा रक्कम अदा केली. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष चमणकर यांनी रिलायन्सचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच याप्रश्नी सर्व बागायतदारांनी जोरदार पाठिंबा देऊन मागणी मान्य होईपर्यंत लढा दिल्याबद्दल आंबा काजू उत्पादक बागायतदार संघटनेच्यावतीने समाधान व्यक्त केले.
----------------
वेंगुर्ले बाजारात वाहतूक कोंडी
वेंगुर्ले ः गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमान्यांच्या गाड्या दाखल झाल्या असून यामुळे वेंगुर्ले बाजारपेठेत सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. चाकरमान्यांबरोबच स्थानिक नागरिकांच्या तसेच व्यावसायिकांच्या गाड्या बाजारात येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
--
‘बुस्टर’बाबत उदासीनता
सिंधुदुर्ग ः आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधक तिसरा बुस्टर डोस मोफत दिला जात आहे; मात्र हा डोस घेण्याबाबत नागरिकांमधून बेफिकीरपणा दिसत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93112 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..