जिल्ह्याचे प्रवेशद्वार बांद्यात उभारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्याचे प्रवेशद्वार बांद्यात उभारा
जिल्ह्याचे प्रवेशद्वार बांद्यात उभारा

जिल्ह्याचे प्रवेशद्वार बांद्यात उभारा

sakal_logo
By

47576
बांदा ः अधिकाऱ्यांना सूचना देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

जिल्ह्याचे प्रवेशद्वार बांद्यात उभारा

शिक्षणमंत्री दीपक केसरकर ः एकाच ठिकाणी वाहनांची तपासणी करा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख देणारे बांदा येथे प्रवेशद्वार उभे करावे, त्याठिकाणी आरटीओ पोलिस आणि एक्साईज यांच्यातर्फे एकाच ठिकाणी तपासणी करण्यात यावी, त्यानंतर जिल्ह्यात अन्य कोठेही गाड्या तपासल्या जाऊ नयेत. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, बांदा येथे उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना थांबवण्यासाठी चांगल्या सुविधा, रेस्टॉरंट आणि बगिचा उभारावा आणि त्याचे काम तातडीने सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले.
केसरकर यांनी काल (शुक्रवारी) सायंकाळी उशिरा येथील नियोजित प्रवेशद्वाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना त्यांनी या सुचना दिल्या. यावेळी मंत्री केसरकर यांनी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावरील सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सहायक वनसंरक्षक वर्षा खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, क्षेत्रीय वन अधिकारी विद्या घोडके, तहसीलदार श्रीधर पाटील, पोलिस निरीक्षक शामराव काळे, सरपंच अक्रम खान आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘राष्ट्रीय महामार्ग ॲथोरेटीने एमटीडीसीच्या विभागाबरोबर उद्याच जागेची पाहणी करावी. या प्रवेशव्दारावर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा उभाराव्यात. या ठिकाणी माहिती पत्रके वाटण्यासाठी माहिती केंद्र उभे करावे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती एलईडी स्क्रीनवर दर्शवावी. सीमा तपासणी नाक्यावर परिवहन विभाग, पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी एकाच ठिकाणी करावी. त्या वाहनांची जिल्ह्यात कोठेही पुन्हा तपासणी होणार नाही, असे स्टीकर गाडीवर लावावेत.’’
---
आंबोलीबाबतही सूचना
बांदा येथील किल्ला पर्यटनासाठी खुला करून बांदा पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. वनविभागाने आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी. पार्किंगपासून धबधब्यापर्यंत पर्यटकांना सोडण्यासाठी बॅटरीवरील वाहनांची सोय करावी. यासाठी माजी सैनिक, तरुण वर्गाचे सहकार्य घ्यावे. आंबोलीतील चारही धबधब्यांची पर्यटकांसाठी साखळी करावी. कावळेसादला पोलिस चौकी बांधावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93115 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..