मोटारीला गवा धडकल्याने तळवडेतील दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारीला गवा धडकल्याने
तळवडेतील दोघे जखमी
मोटारीला गवा धडकल्याने तळवडेतील दोघे जखमी

मोटारीला गवा धडकल्याने तळवडेतील दोघे जखमी

sakal_logo
By

47579
सावंतवाडी ः अपघातग्रस्त मोटार.

मोटारीला गवा धडकल्याने
तळवडेतील दोघे जखमी
सावंतवाडी, ता. ३ ः माजगाव येथे गव्याने मोटारीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तळवडे येथील आई व मुलगा जखमी झाले. तर मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अमिता अशोक कामत (वय ६५) व विश्वनाथ कामत, अशी जखमींची नावे आहेत. माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी स्थळानजीक सावंतवाडी-शिरोडा मार्गावर आज सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गव्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ओटवणे येथे आठवडाभरापूर्वी असाच अपघात घडला होता. त्यामुळे वनविभागाने योग्य ते नियोजन करून थेट रस्त्यावर येणाऱ्या गव्यांना जंगलात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93120 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..