शिरोड्यातील युवक दुचाकी अपघातात ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोड्यातील युवक
दुचाकी अपघातात ठार
शिरोड्यातील युवक दुचाकी अपघातात ठार

शिरोड्यातील युवक दुचाकी अपघातात ठार

sakal_logo
By

टीपः swt३३१.jpg मध्ये फोटो आहे.
47595 - मोहम्मद पाकजोद

शिरोड्यातील युवक
दुचाकी अपघातात ठार
वेंगुर्ले, ता. ३ ः शिरोडा-मिठागर येथे झालेल्या दुचाकी अपघातात शिरोडा रामदासवाडीतील युवक जागीच ठार झाला. मोहम्मद रफीक पाकजोद (वय १९) असे त्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र कौस्तुभ धनजी किरकोळ जखमी झाला. अपघात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
अधिक माहिती अशी की, मोहम्मद याचे वडील शिरोडा बाजारपेठेत फळ विक्रीचा व्यवसाय करतात. कामानिमित्त मोहम्मद दुचाकीवरून धनजीसमवेत आज रेडी परिसरात गेला होता. तेथून परत येत असताना अपघात झाला. त्यावेळी तो दुचाकीवरून उडून थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या मैलाच्या दगडावर आदळल्याने जागीच ठार झाला. सुदैवाने धनजीला किरकोळ दुखापत झाली. अपघात होताच तेथील लोकांनी धाव घेत दोघांना रुग्णालयात हलविले. मोहम्मद अकरावीत शिकत होता. त्याच्या मागे आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, त्याचा मृतदेह बेळगाव येथील मूळ गावी घेऊन जाणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93140 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..