रत्नागिरी- भोलेशंकर चलचित्र देखावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- भोलेशंकर चलचित्र देखावा
रत्नागिरी- भोलेशंकर चलचित्र देखावा

रत्नागिरी- भोलेशंकर चलचित्र देखावा

sakal_logo
By

फोटो ओळी
rat४p८.jpg KOP२२L४७६७३आडिवरे : येथील संकेत नांदगावकर यांनी साकारलेला श्री शिवशंकर भोलेनाथाचा देखावा.
-----------------

नवेदर आडिवऱ्यात भोलेनाथाचा चलचित्र देखावा
--
नांदगावकर कुटुंबीय; स्पर्धांमध्ये मिळवतात बक्षीसे
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : धार्मिक, अध्यात्मिक व पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे देखावे प्रतिवर्षी साकारणाऱ्या नवेदर, आडिवरे (ता. राजापूर) येथील नांदगावकर कुटुंबियांनी यंदा श्री शिवशंकर भोलेनाथाचा चलचित्र देखावा साकारला आहे. प्रकाशयोजना व संगीताचा सुयोग्य वापर केला असून डमरू, त्रिशूळ डोलू लागतो, कमळातून गणेशाची मूर्ती प्रकट होते, हा देखावा सुरेख उभारला आहे. पर्यावरणपूरक साहित्य वापरून साकारलेल्या या देखाव्याला सव्वा महिने तयारी सुरू होती. कुटुंबीयांनी एकत्र येत हा देखावा उभारला असून तो पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
आडिवरे येथील नवेदर वाडीतील श्रीमती प्रीती प्रकाश नांदगावकर यांच्या घरी श्री गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चलचित्र देखावा सादर केला आहे. सामाजिक, अध्यात्मिक असे विविध विषयावर आधारित देखावे दरवर्षी बनवण्यात नांदगावकर कुटुंबिय नेहमीच पुढे असतात. देखावे बनवण्यासाठी प्रेरणास्थान (कै.) सुधीर विष्णू नांदगांवकर असल्याचे देखावा साकारणाऱ्या संकेत प्रकाश नांदगावकर यांनी सांगितले. संकेत, सूरज, सोहन नांदगावकर यांनी देखावा साकारला आहे.
शिवशंकर भोलेनाथ हा देखावा साकारताना मोठी शिवपिंडी बनवली आहे. तसेच पर्यावरणपूरक सर्व साहित्य वापरण्यात आले आहे. आकर्षक प्रकाशयोजना, पांढरे ढग, पिंडी, शिवशंभू, डमरू आणि त्रिशूळ असा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. वक्रतुंड महाकायने देखाव्याला सुरवात होते. कमळातून गणपती बाप्पाची मूर्ती प्रकट होते. शिवशंकर शंभूंची निळ्या, काळ्या रंगाची प्रतिमा प्रकट होते. ओम नम:शिवाय आणि तांडव नृत्याच्या संगीतात डमरू व त्रिशुळ डोलू लागतो. हा देखावा बनवण्यासाठी सुमारे एक ते सव्वा महिने कालावधी लागला. प्रकाशयोजना व संगीताचा सुयोग्य वापर करण्यात आला आहे. नांदगावकरांच्या घरातील सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन हा देखावा उभारला आहे. गणपतीची मूर्ती दिनेश पांचाळ व सहकाऱ्यांनी बनवली आहे.
-------------------
चौकट १
आकर्षक देखावे
यापूर्वी नांदगावकर कुटुंबीयांनी विविध विषयांवर देखावे साकारले आहेत. त्यात त्यांना मंगलमूर्ती प्रतिष्ठान व अन्य संस्थांनी आयोजित केलेल्या गणेश सजावट स्पर्धांमध्ये बक्षीस मिळाले आहे. नांदगावकर यांनी यांनी पिंडी दर्शन धबधबा निसर्ग देखावा, गणेशोत्सवामधील चुकीच्या पद्धती संस्कृती व पर्यावरण हानी, संत नामदेव देखावा, साईबाबा देखावा, शिवशंकर भोलेनाथ असे देखावे साकारले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93242 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..