रत्नागिरी-रत्नागिरीतील पाच मुलींची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीतील पाच मुलींची निवड
रत्नागिरी-रत्नागिरीतील पाच मुलींची निवड

रत्नागिरी-रत्नागिरीतील पाच मुलींची निवड

sakal_logo
By

फोटो ओळी
rat४p१२.jpg-KOP२२L४७६९१ रत्नागिरी ः क्रिकेट लीग स्पर्धेसाठी रत्नागिरीतील पाच मुली
----------------

राज्य महिला क्रिकेट लीग स्पर्धेसाठी
रत्नागिरीतील पाच मुलींची निवड
रत्नागिरी, ता. ४ : महिलांच्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय महाराष्ट्र लीग स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५ मुलींची निवड झाली आहे. त्यातील ४ मुली टीएलबी क्रिकेट अकॅडमीतील तर एक मुलगी छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीतील आहेत.
पुणे येथे १९ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहेत. त्यासाठी राज्यात सर्वत्र जिल्हास्तरावर निवड चाचणी घेण्यात आली. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महिला क्रिकेट संघाच्या नुकत्याच झालेल्या निवड चाचणी मध्ये टीएलबी क्रिकेट अकॅडमीच्या ४ विद्यार्थिनी महेक हुनेरकर - उपकर्णधार (राजीवडा), सृष्टी पवार (काजरघाटी), संचिता लिंगायत (परचुरी), अनुश्री सागवेकर (नेवरे) आणि कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीची १ विद्यार्थिनी आर्या मयेकर (काळबादेवी) यांची निवड झाली असून ४ सप्टेंबर पासून बारामती येथे रत्नागिरीचा संघ कोल्हापूर पुणे आणि एमसीए संघाबरोबर खेळणार आहे. टीएलबी क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख कोच वृंदावन पवार, अभिषेक किर, रणधीर सावंत यांचे यांचे या महिला खेळाडूंना मार्गदर्शन लाभले असून रत्नागिरी जिल्ह्यातील महिला देखील आता क्रिकेट मैदान गाजवणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93243 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..