वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी मालवणात दुचाकीस्वरांना दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी
मालवणात दुचाकीस्वरांना दणका
वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी मालवणात दुचाकीस्वरांना दणका

वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी मालवणात दुचाकीस्वरांना दणका

sakal_logo
By

47784
मालवण ः कारवाईसाठी उभे असलेले वाहतूक पोलिस.

वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी
मालवणात दुचाकीस्वरांना दणका
मालवण ः वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश बुलेट चालवणारे ५ जण तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी अन्य ५ दुचाकीस्वार, अशा एकूण दहा जणांवर येथील पोलिसांनी आज कारवाई केली. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस अमित हरमलकर यांनी भरड मार्गावर ही कारवाई केली. कारवाई मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विजय यादव यांनी केले आहे.
---
47712
कवठी ः नारळ लढवणे स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देताना रुपेश पावसकर, राजू गवंडे, संजय करलकर आदी.

नारळ लढवणेत खडपकर प्रथम
कुडाळ ः सातेरी क्रिकेट मंडळ कवठी आयोजित नारळ लढवणे स्पर्धेत अमर खडपकर (कवठी) विजेते, तर पांडुरंग नाईक (चेंदवण) उपविजेते ठरले. यावेळी आयोजक संजय करलकर, पांडुरंग पाटील, मुरलीधर बांदेकर, सुबोध खोत व कवठी युवक मित्रमंडळ, दीपमाळी मित्रमंडळ आणि कवठी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रथम क्रमांकास १५५५ रुपये व दवितीय क्रमांकास ५५५ रुपये बक्षीस देण्यात आले. शिवसेना ओबीसी जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर, ओबीसी शहराध्यक्ष राजू गवंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी सरपंच रुपेश वाड्येकर, दादा करालकर, पप्पू वाडेकर, संतोष करळकर, संतोष वाडयेकर, संदेश करंगुटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93253 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..