साखरपा ः जोशी कुटुंबीयांकडे गणपती नवरात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा ः  जोशी कुटुंबीयांकडे गणपती नवरात्रोत्सव
साखरपा ः जोशी कुटुंबीयांकडे गणपती नवरात्रोत्सव

साखरपा ः जोशी कुटुंबीयांकडे गणपती नवरात्रोत्सव

sakal_logo
By

सकाळ विशेष ......लोगो

फोटो ओळी
-rat3p7.jpg -KOP22L47463साखरपा ः येथील नजीकच्या भडकंब्यातील जोशी कुटुंबीयांकडील गणपती नवरात्रोत्सवाची परंपरा जोपासली जाते
-rat4p2.jpg ः KOP22L47676 साखरपा ः पर्शुराम जोशी यांच्या घरचा प्रतिपदेला विराजमान झालेला गणेश, पंचधातूचा गणेश आणि नर्मदा गणेश.

भडकंब्यातील जोशी कुटुंबीयांकडे गणपती नवरात्रोत्सव
आगळी परंपरा ; भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून उत्सवाचा आरंभ
अमित पंडित ः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. 4 ः येथील नजीकच्या भडकंब्यातील जोशी कुटुंबीय गणपती नवरात्रोत्सवाची आगळीवेगळी परंपरा जपत आहेत. भडकंबा दत्तवाडी येथील पर्शुराम जोशी व कुटुंबीय पिढ्यानपिढ्या गणेशोत्सवाची ही आगळीवेगळी परंपरा जोपासत आहेत. साखरपा पंचक्रोशीत भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच सर्वप्रथम आगमन होणारा हा गणपती म्हणून याची ओळख आहे. प्रतिपदेपासून गौरी गणपती विसर्जनापर्यंत गणपतीच्या नवरात्रोत्सवाची या कुटुंबाची परंपरा आहे. प्रतिपदेपासून सुरू होऊन गौरी विसर्जनापर्यंत सुरू राहणारा हा गणेशोत्सव नऊ दिवसांमुळे गणेश नवरात्रोत्सव म्हणूनही ओळखला जातो.
प्रतिपदेला ब्रह्मवृदांच्या मंत्रोच्चारात या उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. तसेच गणपती अथर्वशीर्षाच्या एक हजार आवृत्या ब्रह्मवृदांमार्फत आळवल्या जातात आणि जोशी कुटुंबासमवेतच संपूर्ण पंचक्रोशीतील गणेशोत्सवाचा आरंभ होतो. मुळचे कृष्णाकाठच्या कराड येथील असणाऱ्या जोशींच्या अनेक पिढ्या कोकणात वास्तव्यास आहेत. मुळचे ज्योतिषी आणि अपभ्रंशाने जोशी झालेल्या कुटुंबावर गणपतीचा विशेष वरदहस्त आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. देवघरातील पंचधातूंच्या ठसठशीत गणेशमूर्ती व दुर्मिळ असे नर्मदा गणपतीदेखील यांच्याकडे पाहावयास मिळतात.
सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार संतोष जामसंडेकर यांच्या हस्तकौशल्यातून ही मूर्ती तयार होते. जोशी कुटुंबातील माहेरवाशिणी, सुना, नातवंडे आपले नोकरी व्यवसाय सांभाळून गणेशाच्या दर्शनाला आवर्जून उपस्थित राहतात.

कोट
आमच्या घरातील हा गणेशोत्सव उत्तरोत्तर वाढत जावो व जोशी कुटुंबीयांप्रमाणेच सर्वांच्या इच्छांची पूर्तता होवो हेच आमचे नेहमी मागणे गणरायाकडे असते.
- प्रवीण जोशी, भडकंबा

चौकट
विधीवत पूजा उत्सवादरम्यान
जोशी घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घराण्याच्या देव्हार्‍यात पंचधातूंची गणेशमूर्ती आहे. तसेच दुर्मिळ असा नर्मदा गणेशही आहे. पुराण काळात गणेशाचे शीर धडापासून विलग करण्यात आल्यावर ते नर्मदा नदीत पडले आणि त्या रक्ताने नर्मदेतील दगड पावन झाले. त्यांनाच नर्मदा गणेश, असे संबोधले गेले. अशाचपैकी एक गणेश जोशी यांच्या देव्हाऱ्यात आहे. याचीही विधीवत पूजा उत्सवादरम्यान केली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93269 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..