चिपळूण ः दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या मास्टर डिग्रीसाठी प्रज्ञा इंगवले पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या मास्टर डिग्रीसाठी प्रज्ञा इंगवले पात्र
चिपळूण ः दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या मास्टर डिग्रीसाठी प्रज्ञा इंगवले पात्र

चिपळूण ः दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या मास्टर डिग्रीसाठी प्रज्ञा इंगवले पात्र

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat4p14.jpg -KOP22L47716 प्रज्ञा इंगवले
-------------------
संग्रहालय विज्ञान अभ्यासक्रमास प्रज्ञा इंगवलेची निवड
चिपळूणची कन्या ; जगभरातून 16, महाराष्ट्रातून दोघी पात्र
शिरीष दामले ःसकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. 4 ः चिपळूणची कन्या प्रज्ञा इंगवले हिची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या संग्रहालय विज्ञान विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. प्रज्ञासह मुंबईतील यशस्विता काळे या दोघींचीच निवड झाली असून जगातून या अभ्यासक्रमासाठी दोन हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातून 16 विद्यार्थ्यांची निवड झाली. यातअसून, महाराष्ट्रातील फक्त दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
याबाबत दै. सकाळशी बोलताना प्रज्ञा म्हणाली की, तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिपळुणातच झाले. तिला चित्रकलेची आवड आहे. त्यामुळे एक वर्ष सह्याद्री कला महाविद्यालयात शिक्षण घेतले. नंतर अभिनव कॉलेज पुणे येथेही पुढील शिक्षण घेतले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मराठी व इतिहास विषय घेऊन पदवी मिळवली. संग्रहालय विज्ञान म्हणजे म्युझियमची देखभाल करण्यापासून ते उभारण्यापर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश असलेला अभ्यास करायचा आहे. यात दिल्लीमध्ये ती भारतीय कलांचा इतिहास तसेच पाश्चात्य कलांचा इतिहास शिकणार आहे. यासह वस्तुसंग्रहालय वा संग्रहालयातील सामग्री कशी राखायची, संवर्धन, जतन कसे करायचे या अभ्यासासह दस्तावेजीकरण शिकणार आहे.
फक्त चित्रकलेशी संबंधित पदव्युत्तर शिक्षण न घेता तिने म्युझिऑलॉजी हा अभ्यासक्रम निवडला आहे. यामध्ये चित्र, शिल्प, टेक्स्टाईल आदीचा समावेश आहे. नवी दिल्लीतील संग्रहालय विज्ञान पदवीसाठी प्रयत्न करताना तिने लेखी परीक्षा, मुलाखत दिली. ही परीक्षा हिंदी भाषेतूनही देता येते, असे सांगून तिने हिंदीला पसंती दिल्याचे सांगितले.
मळलेली वाट सोडून वेगळ्या अभ्यासाकडे जाण्याच्या तिच्या निर्णयाला येथील वडिल प्रसिद्ध कवी, बोलीभाषा अभ्यासक आणि समीक्षक अरुण इंगवले यांनी आनंदाने संमत्ती दिली. येथील शिक्षणाची पद्धत केवळ वर्गातील शिकवण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संग्रहालयाच्या गॅलरी, साठवण/आरक्षित संग्रह आणि प्रयोगशाळांची ओळख करून देणे अशी आहे.

चौकट
देशातील अग्रगण्य संस्था
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय संस्थान ही संस्था कला आणि सांस्कृतिक वारसा क्षेत्रातील प्रशिक्षण आणि संशोधनासाठी देशातील अग्रगण्य संस्था आहे. या संग्रहालयात भारतीय आणि विदेशी अशा एकत्रित जवळपास दोन लाख वस्तू संग्रहित आहेत.


कोट
प्रज्ञा ही उत्तम कलाकार असून तिने यापूर्वी ‘लोटिस्मा’ वाचनालयाच्या कलादालनात कवी गझलकार खांवर आणि सोनोपंत दांडेकर यांची पोर्ट्रेट्स साकारली आहेत. प्रज्ञाने संग्रहालय विज्ञान शिकायला जाणे हा निर्णय अपरान्त भूमीला अभिमानास्पद आहे.
-- प्रकाश देशपांडे, लोटिस्मा वस्तूसंग्रहालय निर्माते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93271 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..