खेड ः रघुवीर घाटात संरक्षक भिंती बांधकामास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः रघुवीर घाटात संरक्षक भिंती बांधकामास मंजुरी
खेड ः रघुवीर घाटात संरक्षक भिंती बांधकामास मंजुरी

खेड ः रघुवीर घाटात संरक्षक भिंती बांधकामास मंजुरी

sakal_logo
By

रघुवीर घाटात संरक्षक भिंतीना मंजुरी
निविदा प्रक्रिया पूर्ण ; २० किमी अंतरात २ भिंती
खेड, ता. ४ ः तालुक्यातील रघुवीर घाटात पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळून मार्ग ठप्प होत असतो. या पार्श्‍वभूमीवर रघुवीर घाटात २० किमी लांबीच्या २ संरक्षक भिंती बांधण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. या मंजूर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पाऊस कमी होताच संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता आशा जटाळ यांनी सांगितले.
रघुवीर घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. एका बाजूला रस्त्याचा भाग खचला असल्याने हा घाट पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. या घाटात सतत दरडी कोसळत असल्याने वाहतूक ठप्प होऊन २१ गावांचा संपर्क तुटत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे फार हाल होत आहेत. रघुवीर घाटाच्या डागडुजीसाठी शिरगाव येथील शशिकांत भोसले व खोपी येथील मनोज भोसले यांनी उपोषणाचा मार्गही पत्करला होता. या उपोषणकर्त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित केले होते. रघुवीर घाटात अनेक कामेदेखील प्रस्तावित आहेत; मात्र हा घाट वाहतुकीच्यादृष्टीने पूर्णपणे सुरळीत राहावा यासाठी २० किमी लांबीच्या २ संरक्षक भिंती उभारण्याबाबतच्या कामाचा समावेश पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आला होता. त्यानुसार या कामास मंजुरी मिळाली आहे. दोन संरक्षक भिंती उभारल्यावर हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93273 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..