चिपळूण- शीला केतकर यांचा आज सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण- शीला केतकर यांचा आज सत्कार
चिपळूण- शीला केतकर यांचा आज सत्कार

चिपळूण- शीला केतकर यांचा आज सत्कार

sakal_logo
By

फोटो ओळी
rat४p१५.jpg -KOP२२L४७७१७ ''कात्यायनी वर्ग चालवणाऱ्या शीला केतकर


''कात्यायनी'' प्रणेत्या शीला केतकर यांचा आज सत्कार
-
चिपळुणात एक तप वर्ग; सतत अध्ययन, अध्यापनात दंग
चिपळूण, ता. ४ ःचिपळूणच्या ''कात्यायनी ''प्रणेत्या शीलाताई केतकर यांचा उद्या शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. एका तपाहून अधिक काळ कात्यायनी वर्ग चालवणाऱ्याया आणि पेढे परशुराम शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात सक्रिय असलेल्या अशी त्यांची ओळख बनली आहे. केतकर या लायनिझम गॅलक्सी, चिपळूणकडून सन्मानित होत आहेत.
केतकर यांच्याविषयी सांगताना अंजली बर्वे म्हणाल्या की,‘ सेवा, व्रत, तप, अध्ययन, अध्यापन याचे हे फलित आहे. माहेरचे पिढीजात संस्कार घेऊन त्या आल्या आहेत. शीलाताईं माहेरच्या उत्तरा पांडुरंग अभ्यंकर. सातारचे पिढ्यांन पिढ्या प्रसिद्ध असणारे हे शास्त्री घराणे. या घरातच दोन महामहोपाध्याय होऊन गेले. घरातच पाठशाळा होती. त्यामुळे आद्य शंकराचार्यांची अनेक स्तोत्रे, विष्णु सहस्र नाम, श्री सूक्त लहानपणी त्यांना मुखोद्गत झालेल. सप्तशती, पुरुष सूक्त ऐकत, बहुश्रुत होत त्या मोठ्या झाल्या. पेढे परशुराम येथे खेडेगावात तीस वर्षापूर्वी घरोघरी, वाडीवाडीत संस्कृत श्लोक म्हटले जाऊ लागले. मारुती मंदिरात ही शाळा सुरू झाली. त्याच्या उभारणी वेळी पहिली तीन वर्षे आणि नंतरची बारा वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी सांभाळली. शीलाताई शंकराचार्याचे चरित्र, कार्य उलगडून सांगतात. या पार्श्‍वभूमीवर केतकर मॅडमचे निरपेक्ष कार्य लक्षात घेऊन आज त्याचा सत्कार होत आहे.

चौकट
सप्तशतीची संथा देतात
निवृत्तीआधीच २०१० साली त्यांनी गृहिणींच्या आग्रहावरून त्यांना सप्तशती संथा देण्यास सुरुवात केली. चिपळूणला पहिला सप्तशती पाठ एकविरेपुढे स्त्रियांनी खणखणीत,स्पष्ट, शुद्ध आवाजात म्हटला. स्त्रियांना आत्मविश्वास, समाधान देणारे हे शिक्षण अनेकींना हवेहवेसे वाटू लागले अन वर्ग सुरू झाला. या वर्गात आता अनेक कात्यायनी तयार होत आहेत. सप्तशती बरोबरच आद्य शंकराचार्यांची स्तोत्रे शिकत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93302 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..