रत्नागिरी-कोतवडेत गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-कोतवडेत गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता
रत्नागिरी-कोतवडेत गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता

रत्नागिरी-कोतवडेत गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat4p13.jpg-22L47715 रत्नागिरी - कोतवडे येथील रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत
-----------------

कोतवडेत गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता
रत्नागिरी, ता. ४ ः कोतवडे ग्रामपंचायत गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. गावातील रस्ते, घाट व विसर्जन स्थळांची स्वच्छता ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आल्याची माहिती सरपंच तुफील पटेल यांनी दिली.
कोतवडे ग्रामपंचायतीने गावातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्याच्या बाजूला असणारी झाडी व वाढलेले गवत स्वच्छ करण्याचे काम गणेशोत्सवापुर्वी पूर्ण केले आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामपंचायत कार्यकारिणीने स्वच्छतेचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर गणपती विसर्जन ज्या ठिकाणी केले जाते असे घाट व विसर्जन स्थळांची स्वच्छता ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. त्यामुळे भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. गावातील सर्व विद्युत पथदिवे सुस्थितीत करण्याचे कामही ग्रामपंचायत हाती घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93308 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..