दोडामार्गला ३४.९२ टक्के पाणी दूषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्गला ३४.९२ टक्के पाणी दूषित
दोडामार्गला ३४.९२ टक्के पाणी दूषित

दोडामार्गला ३४.९२ टक्के पाणी दूषित

sakal_logo
By

34529

दोडामार्गला ३४.९२ टक्के पाणी दूषित

चिंताजनक स्थिती; जिल्हाभर प्रश्‍न गंभीर असल्याचे अहवालातून स्पष्ट

नंदकुमार आयरे ः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट कायम असून त्याचे प्रमाण चिंताजनक असे आहे. दोडामार्ग तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण (३४.९२ टक्के) सर्वाधिक असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै अखेर तपासण्यात आलेल्या एकुण १४०१ पाणी नमुन्यांपैकी १०६ दूषित आढळले आहेत. हे प्रमाण सरासरी ७.५७ टक्के एवढे आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पाणी नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जाते. जुलैच्या पाणी नमुने तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील दूषित पाण्याचे प्रमाण पाहता सरासरी ७.५७ टक्के एवढे असले तरी दोडामार्ग तालुक्यातील दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक ३४.९२ टक्के असे चिंताजनक आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या मदतीने पाणी नमुने तपासण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या जलदुतांमार्फत दर महिन्याला काही ठराविक भागातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्यानंतर प्रयोगशाळेत या पाणी नामुन्यांची तपासणी करून हे पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य आहेत की अयोग्य, याबाबतचा अहवाल प्रयोगशाळेमार्फत देण्यात येतो. पाणी नमुने दूषित आढळून आल्यास ते जलस्रोत शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतात. दूषित पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतर पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे बघण्यासाठी पुन्हा नमुने तपासण्यात येतात. त्यानंतरच पिण्यासाठी पाणी वापरले जाते; मात्र जिल्ह्यातील दूषित पाण्याचे संकट कायम असून दूषित पाण्याचे प्रमाण पाहता वेळीच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
...............
तालुकानिहाय तपासलेले नमुने
तपासलेले पाणी नमुने, दूषित नमुने व कंसात त्यांची टक्केवारी ः सावंतवाडी ः १८२, ११ (६.०४ टक्के), वेंगुर्ले ः १८०, १७ (९.४४ टक्के), कुडाळ ः ३१५, ११ (३.४९ टक्के), मालवण ः २९५, २० (६.७८ टक्के), कणकवली ः १९५, २० (१०.२६ टक्के), वैभववाडी ः ८८, २ (२.२७ टक्के).

कोट
जिल्ह्यात गणेशोत्सव सुरु असून दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यास साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असून या मागची कारणे शोधा व उपाय योजना करा, तसेच जास्तीत जास्त पाणी नमुने तपासणीला पाठविण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत. साथीचे आजार पसरणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ महेश खलिपे, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93327 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..