दाभोळ- बिबट्याच्या वावराने बागायतदार,मजुर चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ- बिबट्याच्या वावराने बागायतदार,मजुर चिंतेत
दाभोळ- बिबट्याच्या वावराने बागायतदार,मजुर चिंतेत

दाभोळ- बिबट्याच्या वावराने बागायतदार,मजुर चिंतेत

sakal_logo
By

बिबट्याच्या वावराने बागायतदार, मजूर चिंतेत
--
साखळोलीत ग्रामस्थांवर हल्ला ; शिवनारी गावाकडे मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. 4 : दापोली तालुक्यातील शिवाजीनगर साखळोली शिवनारी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून येथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गेले काही महिने शिवाजीनगर व साखळोली परिसरात बिबट्याची मादी आपल्या पिलांसह अनेक नागरिकांना आढळून आली होती. अनेकवेळा रस्त्यावरून जाणार्‍या ग्रामस्थांवर या बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थ जखमी झाले आहेत. बिबट्याच्या वावरामुळे येथील मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे.
या परिसरात अनेक बागा व नर्सरी असून यामध्ये काम करण्यासाठी येथील स्थानिक मजुर याच परिसरात ये-जा करीत असतात. मात्र बिबट्याच्या वावरामुळे येथील मजुरांची संख्या कमी झाली आहे. तरी मजुरांना या परिसरात नाईलाजास्तव जीव मुठीत घेवुन मजुरीसाठी जावे लागत आहे. काहीनी तर भीतीने कामावर जाणे सोडले आहे. आधीच नवीन यंत्रसामु्ग्रीमुळे शेती बागायतीमधील मजुरांची संख्या कमी झाली असून हाताला काम मिळणे कमी झालेले असताना आता जे काम मिळते आहे ते बिबट्याच्या दहशतीमुळे सोडावे लागत आहे. त्यामुळे येथील हातावरती पोट असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबरोबर बागायती व शेतीची कामे तण काढणे, साफसफाई करणे यासाठी मजुर मिळत नसल्याने बागायतदारांना चिंता भेडसावत आहे. आता या बिबट्याने जवळच असणार्‍या शिवनारी गावाकडे आपला मोर्चा वळवला असून साखळोली येथील प्राथमिक उपचार केंद्राच्या चालकाला शिवनारी तिठा येथे हा बिबट्या आढळून आला असल्याची माहिती मिळत आहे. दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
याबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या अगोदरच वनविभागाकडे सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली असून त्यानुसार दापोली वनविभाग स्थानिकांच्या सहकार्याने ट्रॅप लावण्यासाठी कारीवणे परिसरात संशयास्पद वावर असलेल्या ठिकाणी तीन कॅमेरे बसविण्यात आले असून या तिन्ही कॅमेऱ्यांना बिबट्याने चकवा देत असून अद्याप एकाही कॅमेरामध्ये त्याचा संशयास्पद वावर दिसून आला नसल्याचे वनविभागाने सांगितले आहे. या परिसरात पेट्रोलिंगच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. मात्र त्यांच्याही नजरेस बिबट्या हा पडला नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
-------------
चौकट
वनविभागाकडून कॅमेरा
शिवनारी येथे बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर शिवनारी तिठा येथे वनविभागाकडून कॅमेरा बसविण्यात आला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. आजपर्यत वनविभागाने लावलेल्या कॅमेर्‍यामध्ये बिबट्याची कोणतीही हालचाल अथवा बिबट्याची छायाचित्रे हाती आली नसल्याने ग्रामस्थांची निराशा झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93350 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..