चिपळूण - रामदास कदम किती बेईमान महाराष्ट्र पाहतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - रामदास कदम किती बेईमान महाराष्ट्र पाहतोय
चिपळूण - रामदास कदम किती बेईमान महाराष्ट्र पाहतोय

चिपळूण - रामदास कदम किती बेईमान महाराष्ट्र पाहतोय

sakal_logo
By

भास्कर जाधव -यांचे छायाचित्र

रामदास कदम किती बेईमान महाराष्ट्र पाहतोय
--
भास्कर जाधव; पराभवानंतरही ठाकरे यांनी त्यांना आमदार, मंत्री केले
चिपळूण, ता. ४ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पहिला दसरा मेळावा झाला. तेव्हा रामदास कदमांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणून भाषण केले होते. तोच दसरा मेळावा आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होऊ नये, असे कदमांनी म्हणणे म्हणजे ते किती कृतघ्न आहेत, ते किती उलट्या काळजाचे आणि बेईमान आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय अशी टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली, तेव्हाच बाळासाहेब हा विषय त्यांच्यासाठी संपला. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला. त्याच शरद पवारांच्या मांडीवर उद्धव ठाकरे जाऊन बसले, अशी बोचरी टीका रामदास कदमांनी केली होती.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर गुहागर शिवसेनेतर्फे शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी रामदास कदमांचा समाचार घेतला. विशेष म्हणजे भास्कर जाधवांनी रामदास कदमांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘रामदास कदम यांच्यासारखा कृतघ्न माणूस मी कधीही बघितला नाही. रामदास कदम कोण आहे ? त्यांचा शिवसेना मेळाव्याशी काय संबंध आहे ? रामदास कदम सध्या ज्यापद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, जे आरोप करत आहेत, जी भाषा वापरत आहेत, यावरून रामदास कदम इतके कृतघ्न असतील, असे मला वाटलं नव्हते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदार आणि दोनवेळा मंत्री केले. मुलाला तिकीट दिले. मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही. मातोश्रीशी एकनिष्ठ राहिन, असे कालपर्यंत रामदास कदम बोलत होते. आता तेच रामदास कदम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करीत आहेत.’


चौकट
आदित्यवर टीका, योगेशचे काय?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे आम्हा ज्येष्ठ नेत्याना ऐकावे लागते, असा आरोप रामदास कदम करत आहेत. मग दापोली मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी त्यांच्या पुत्राच्या नेतृत्वाखाली का काम करावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93353 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..