चिपळूण - संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - संक्षिप्त
चिपळूण - संक्षिप्त

चिपळूण - संक्षिप्त

sakal_logo
By

मेमू ट्रेन ९ सप्टेंबरपर्यंत धावणार
चिपळूण ः गणेशोत्सवादरम्यान रोहा ते चिपळूण दरम्यान धावणारी मेमू ट्रेन ९ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची सोय व्हावी यासाठी रेल्वेने २७२ विशेष जादा गाड्यांची सोय केली आहे. त्याशिवाय दैनंदिन फेऱ्याही कायम आहेत. रोहा ते चिपळूणपर्यंत ८ डब्यांची मेमू स्पेशल ही विशेष गाडी सुरू केली होती. ही गाडी दिवा येथून सुटते. रोहा ते चिपळूणचा प्रवास करून पुन्हा सांयाकळी दिव्याकडे जाते. या रेल्वेने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठाणे, पनवेल, नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या गणेशभक्तांकडून या रेल्वेला पसंती मिळत आहे. त्यामुळे ९ सप्टेंबरपर्यंत ही रेल्वे सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.


भटक्या कुत्र्यांची ऑक्टोंबरमध्ये नसबंदी
चिपळूण ः शहरातील भटक्या कुत्र्यांची ऑक्टोंबरमध्ये नसबंदी केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. इच्छूक एजन्सींकडून निविदा मागवण्यात आली आहे. चिपळूण शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत आहे. यापूर्वी पहिल्या टप्यात शहरातील चारशेहून अधिक कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती. मात्र पुन्हा भटकी कुत्री वाढली आहेत. गोवळकोट येथे एका चार वर्षाच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला केल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी पालिकेवर धडक देत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93363 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..