दाभोळ-पर्यावरणपूरक देखावे पाहण्यासाठी सायकलवरून जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-पर्यावरणपूरक देखावे पाहण्यासाठी सायकलवरून जनजागृती
दाभोळ-पर्यावरणपूरक देखावे पाहण्यासाठी सायकलवरून जनजागृती

दाभोळ-पर्यावरणपूरक देखावे पाहण्यासाठी सायकलवरून जनजागृती

sakal_logo
By

-rat4p27.jpg- KOP22L47828दापोली ः जनजागृतीसाठी काढलेल्या सायकल फेरीत सहभागी मुले, नागरिक.
---------------

पर्यावरणपूरक देखावे पाहण्यासाठी सायकलवरून जनजागृती

दापोलीत क्लबचा उपक्रम ; वेगवेगळ्या देखाव्यांतून सामाजिक संदेश

दाभोळ, ता.५ः दापोली परिसरात अनेक ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त वसुंधरा संरक्षण, इतर प्रबोधनात्मक संदेश देणारे चलतचित्र देखावे व पर्यावरणपूरक साहित्य वापरुन सजावट केली आहे. हे देखावे, सजावट पाहण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आज सायकल फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
8 किमी अंतराची ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी 7.30 वाजता सुरू झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. गणपती बाप्पाचा जयघोष करत दापोली परिसरातील काही सार्वजनिक आणि घरगुती गणपती सजावट देखावे पाहण्यात आले. ओम साईराम मित्र मंडळ आयोजित दापोलीचा राजा येथे गडकिल्ले रक्षण संवर्धन संदेश देणारा देखावा पाहिला. तसेच बाल गणेश मित्र मंडळ, श्री मानाचा गणपती, व्यापारी मित्र मंडळ नवसाचा राजा इत्यादी ठिकाणी दर्शन घेतले, सजावट पाहिली. कल्पेश रेळेकर यांनी स्वच्छ्ता, वृक्षतोड, उत्खनन, पाणी अडवा पाणी जिरवा या दृष्यातून वसुंधरेचे संरक्षण करणेचा संदेश देणारा देखावा साकारला आहे. हसमुख पांगारकर यांनी टाकावू साहित्य वापरुन ऐतिहासिक देखावा साकारला आहे. विजय रेमजे यांनी समुद्रमंथन याद्वारे चालू घडामोडी व पर्यावरण रक्षण संदेश देणारा देखावा तयार केला आहे. महेश राळे लालबाग यांनी बारा ज्योतिर्लिंग देखावा उभारला आहे. हे चलचित्र देखावे, त्यातील संदेश, इतिहास, गोष्टी, सजावट करण्यासाठी वापरलेले साहित्य याबद्दलची माहिती सर्वांनी जाणून घेतली. नवीन माहिती समजल्यामुळे सर्वजण खुश झाले.
सायकल फेरीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, सुरज शेठ, वरुण महाजन, सुनील रिसबूड, पराग केळस्कर, केतन पालवणकर, सुधीर चव्हाण, सर्वेश बागकर, सुरज भुवड इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93376 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..